Water Crisis : धरणालगतच्या वाड्या तहानलेल्‍या

Water Shortage : देहरंग धरणाच्या आसपास अदिवासीवाड्या असूनही प्रभावी यंत्रणेअभावी लगतच्या वाड्यांना धरणाच्या पाण्याचा उपयोग होत नाही.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon

Panvel News : देहरंग धरणाच्या आसपास अदिवासीवाड्या असूनही प्रभावी यंत्रणेअभावी लगतच्या वाड्यांना धरणाच्या पाण्याचा उपयोग होत नाही. राज्य सरकारने घरोघरी पाणी पोहोचण्यासाठी जलजीवन मिशन योजना हाती घेतली आहे.

मात्र, ही योजना अपूर्ण असल्यामुळे पनवेल तालुक्‍यातील ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्यांमध्ये पाण्याचे दुभिक्ष्य जाणवत आहे. देहरंग धरण जवळ लगतच्या पाच ते सहा आदिवासीवाड्या तहानलेल्या आहेत.

निवडणुकीच्या प्रचारात सध्या राजकारणी गुंतले आहेत. देहरंग धरण परिसरात मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत वाघाची वाडी, कोंबल टेकडी, औसाची वाडी, सतीची वाडी, धामणी, कोंड्याची वाडी आदी आदिवासी वाड्या आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : नगर जिल्ह्यात वाढल्या पाणीटंचाईच्या झळा

गावात पाणीच येत नसल्याने ग्रामस्‍थांना टँकरने अथवा डोक्यावर हंडे घेऊन धरणातून पाणी आणावे लागत आहे. एकीकडे प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना या आदिवासी वाड्यांमधील रहिवासी पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

तालुक्यातील १३ गावांना टॅंकरने पाणी

पनवेल तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून १३ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या १३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे.

शिरढोण, शिरढोण पाडा, आपटा माडभुवन, आपटा घेरावाडी, कोरळ, आष्टे, कसळखंड शिवाजीनगर, आरीवली, कसळखंड फणसवाडी, कसळखंड, लोणीवली ठाकूरवाडी, वारदोली हालटेपवाडी, ताराटेपवाडी ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com