Timber Transport : विनापरवाना लाकुड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई

Forest Department : पाटस (ता. दौंड) येथे वनविभागाच्या वतीने विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
Timber Transport
Timber TransportAgrowon

Pune News : पाटस (ता. दौंड) येथे वनविभागाच्या वतीने विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संबंधित ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर जप्त करण्यात असल्याची माहिती वनरक्षक रामेश्वर तेलंगरे यांनी दिली.

पुणे सोलापूर महामार्गाने शनिवारी (ता. ६) लाकडाने भरलेला एक ट्रॅक्टर वरवंडकडे जात होता. याबाबत माहिती मिळताच वनरक्षक रामेश्वर तेलंगरे, रमेश कोळेकर यांनी ट्रॅक्टर थांबविला.

Timber Transport
Agriculture Well : राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहिरी

चालकाकडे चौकशी केली असता लाकूड वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत कडूलिंबासह इतर झाडांची लाकडे आढळून आली.

Timber Transport
Agriculture Success Story : कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला फळ पिकांचे बळ

या प्रकरणी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन दौंड येथील वनविभागाच्या नर्सरीच्या प्रांगणात येथे लावण्यात आला. विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी सायंकाळी या ट्रॅक्टर चालकावर वनगुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास वनपाल शीतल खेंडके करीत आहे.

याबाबत तेलंगरे म्हणाले, ‘‘लाकूड वाहतुकीला वनपरवाना असणे गरजेचे आहे. सदर ट्रॅक्टरमध्ये असणारी लाकडे कोठून आणली. त्याठिकाणी वृक्ष तोडीचा परवाना घेण्यात आला होता का? तसेच ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा आहे? या संदर्भात सखोल तपास करण्यात येणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com