Well
Well Agrowon

Agriculture Well : राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहिरी

Well Construction : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) राज्यात येत्या पाच वर्षांत दहा लाख विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.
Published on

Nagpur News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) राज्यात येत्या पाच वर्षांत दहा लाख विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. या वर्षी योजनेला व्यापक प्रतिसाद मिळाला असून तब्बल एक लाखावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती राज्याचे ‘मनरेगा’ आयुक्‍त अजय गुल्हाने यांनी ‘ॲग्रोवन’सोबत बोलताना दिली.

आयुक्‍त गुल्हाने म्हणाले, की राज्यात सिंचन प्रकल्पांना मर्यादा आहेत. त्यामुळे वैयक्‍तिक स्तरावर सिंचनाचे स्रोत शेतकऱ्यांकडे असावे याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याअंतर्गत शेततळे, विहिरींसाठी ‘मनरेगा’तून अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

विहिरींच्या तुलनेत शेततळ्यांना मिळणारा प्रतिसाद कमी आहे. शेततळ्यांमध्ये जागा जाते, असे शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळेच याला प्रतिसाद कमी असला तरी शेततळ्यांचे दूरगामी फायदे आहेत.

Well
Well Subsidy : विहिरीचे अनुदान चार लाखापर्यंत वाढवावे

दरम्यान राज्यात येत्या पाच वर्षांत दहा लाख विहिरी बांधण्याचे प्रस्तावित आहे. यातील पाण्याचा वापर रब्बी पिकांसाठी झाल्यास राज्यात रब्बी क्षेत्र वाढेल त्यातून दुबार पीकपद्धतीला चालना मिळणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा आहे. त्याकरिता ‘मनरेगा’तून विहिरीच्या कामाला प्रोत्साहन दिले जात आहे.

Well
Agriculture Well Scheme : प्रत्येक गावात किमान १५ विहिरी खोदणार

सध्या राज्यात रब्बी आणि खरीप पिकाच्या लागवड क्षेत्रात मोठी दरी आहे; ती कमी व्हावी असेही याद्वारे अपेक्षित आहे. राज्यभरातून यंदा विहिरीच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा व्यापक प्रतिसाद मिळाला असून, एक लाखावर शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पंधरा विहिरी प्रस्तावित आहेत.

ॲपद्वारे करता येते नोंदणी

विहिरीकरिता पूर्वी नोंदणीसाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता MAHA-EGS Horticulture/well हे ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप प्ले-स्टोअरवर असून त्यावर नोंदणी करता येणार आहे. प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्याच्या अर्जाचे ट्रॅकिंग व्हावे याकरिता सेक्‍युअर ही ऑनलाइन प्रणाली आहे.

राज्यात ७०० लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्धतेचे उद्दिष्ट आहे. यातील १०० मनुष्य दिवस कामाचे पैसे केंद्र सरकारकडून दिले जातात. १०० मनुष्य दिवसापेक्षा अधिक दिवस कामासाठी निधीची उपलब्धता राज्य सरकार स्तरावर होते. मनरेगातून २६४ प्रकारची विविध कामे होत आहेत.
- अजय गुल्हाने, आयुक्‍त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com