Nandurbar Water Storage : नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक ; केळीसह भाजीपाला पिकांना आधार

Nandurbar Water Management : मागील हंगामात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागांत अनेक बंधारे मार्चमध्येच कोरडेठाक झाले होते. यंदा सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झाले. त्यात मुबलक जलसाठा आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : नंदुरबार ः मागील हंगामात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागांत अनेक बंधारे मार्चमध्येच कोरडेठाक झाले होते. यंदा सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झाले. त्यात मुबलक जलसाठा आहे. याचा रब्बीसही आधार झाला. आता केळी, पपई, भाजीपाला पिकांची लागवडही मुबलक पाण्याने होत आहे. 

उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढली आहे. उन्हामुळे पिकांना पाण्याची अधिक गरज आहे. पण यंदा पाणी मुबलक आहे. कारण तळोदा, नवापूर, शहादा तालुक्यांतील बंधारे भरले होते. मागील वेळेस तळोदा, शहादा तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक बंधारे व जलसाठे कोरडेठाक राहिले होते. जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात पावसाळ्यात पाण्याचा टिपूसही न साठल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली होती.  शेतकरी व नागरिक चिंतातूर झाले होते.  

Water Storage
Water Storage : खानदेशातील प्रकल्पांत मुबलक जलसाठा

मागील वेळेस एप्रिलमध्ये अनेक भागांतील बोअरवेल्स आटल्याने बागायती शेती धोक्यात आली.  तळोदा, शहादा तालुक्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तळोदा व शहादा तालुक्याची बागायतदार तालुका म्हणून सर्वदूर ओळख आहे. केळी, पपई, ऊस व मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पण या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. यंदा  अनेक बोअरवेल्स जोमात सुरू आहेत. मागील वेळेस मार्चमध्येच अडचणी आल्या होत्या. मिरची लागवडही पुढे होईल. तसेच कापूस, केळी, भाजीपाला पिकांनाही तळोदा, शहादा भागात शेतकरी पसंती देत आहेत. 

भूजलपातळीही स्थिर

शासनाची ‘पाणी अडवा व पाणी जिरवा’ मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, पावसाळ्यापूर्वी नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुराचे पाणी अडविण्यासाठी मध्यंतरी उपक्रम राबविण्यात आले.  विविध सेवाभावी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून नद्यांत खोल नांगरणी करण्याचा उपक्रम राबविला होता.  

शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन नदीत नांगरणी  केली होती. यामुळे  पावसाचे पाणी चाऱ्यांमध्ये  थांबले. नदीकाठी पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच बंधारेही भरले असल्याने मिरची, पपई, केळीची शेती वाढली आहे. शहाद्यातील सुसरी, दरा, चिरडे प्रकल्पही भरले होते. अनेक दिवस गोमाई नदी प्रवाही होती. तापी नदीतही प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये जलसाठा आहे. यामुळे तापीकाठी स्थिती चांगली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com