Delhi Election Politics : दिल्लीकडे वाहणाऱ्या यमुना नदीत हरियाणा सरकारने विष मिसळले : अरविंद केजरीवाल

Yamuna River Poison : दिल्लीकडे वाहणाऱ्या यमुना नदीत हरियाणा सरकारने विष मिसळल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
Delhi Election Politics
Delhi Election Politicsagrowon
Published on
Updated on

Mixed Poison Yamuna River Delhi : दिल्लीकडे वाहणाऱ्या यमुना नदीत हरियाणा सरकारने विष मिसळल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत जल विभागाकडून तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांनी पाहणी करून दिल्लीकडे येणारे नदीतील पाणी अडवले आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या आरोपाची गंभीर दखल पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. दिल्लीतील पाणीपुरवठा १ तृतीयांशाने कमी करण्यात आला आहे.

केजरीवाल म्हणाले की, "हरियाणातील भाजप सरकारने यमुना नदीत विष मिसळले आहे. यावर दिल्ली जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी सीमेवरच अडविले आहे. विषयुक्त पाणी दिल्लीत आले असते तर किती लोकांचा मृत्यू झाला असता, याची कल्पना करवत नाही. दिल्लीत नरसंहार झाला असता,’’ असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, ‘आप’कडून करण्यात आलेल्या आरोपाची दखल घेत निवडणूक आयोगाने हरियाणा सरकारकडून खुलासा मागवल्याची माहिती समोर आली आहे. केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीतील निर्दोष लोकांचा मृत्यू होऊन अराजकता निर्माण व्हावी आणि त्याचे खापर ‘आप’वर फुटावे, यासाठी कट रचण्यात आला होता. हरियाणातील भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे की ज्याची स्वच्छता जलशुद्धीकरण प्रकल्पातही होऊ शकत नाही". असे केजरीवाल म्हणाले.

"भाजप ज्या प्रकारचे राजकारण करत आहे, तसे राजकारण २ दुश्मन देश करत असतात. अमेरिकेने जसा जपानवर अणुहल्ला केला होता. जैविक शस्त्र म्हणून जसे काही देश नदीचे पाणी विषारी बनवतात. जवळपास अशा प्रकारचे कृत्य भाजप सरकारने केले आहे. निवडणूक आयोग सदर प्रकरणात हस्तक्षेप करेल, अशी आशा आहे. असे केजरीवाल म्हणाले.

Delhi Election Politics
Arvind Kejriwal Attack : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर दगडफेक; भाजपवर आरोप

मुख्यमंत्री अतिशी यांच्याकडूनही आरोप

हरियाणा सरकार दिल्लीत अमोनिया युक्त पाणी सोडत असल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही पत्रकार परिषद घेत केला. पाण्याच्या कमतरतेमुळे वझिराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे दिल्लीकरांचा पाणीपुरवठा ३० टक्क्याने कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

हरियाणाच्या मुख्यंमंत्र्यांनी आरोप फेटाळले

हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी केजरीवाल तसेच आतिशी यांचे आरोप फेटाळले आहेत. "केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांना यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शहरातील २८ अस्वच्छ नाल्यांतून नदीत घाण पाणी मिसळले जात आहे. अशुद्ध पाण्याची जबाबदारी ‘आप’ सरकारची आहे. दिल्लीतील लोक सत्तेतून हाकलणार असल्याची जाणीवर झाल्याने ‘आप’वाले खोटेनाटे आरोप करत आहेत", असा सैनी यांनी पलटवार केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com