Agri Transformation: योजनेतून विहीर मिळाली अन् अल्पभूधारक झाला बागायतदार

Farmer Success: पावणेचार एकर शेती. मात्र पाणी नसल्याने कोरडवाहू पिके घ्यावी लागे. कित्येक वेळा पावसाने खंड दिला तर पिके वाया जायची.
Agri Transformation
Agri TransformationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar: पावणेचार एकर शेती. मात्र पाणी नसल्याने कोरडवाहू पिके घ्यावी लागे. कित्येक वेळा पावसाने खंड दिला तर पिके वाया जायची. शेतीसह मोलमजुरी करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला जिल्हा परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून सिंचन विहिरींसाठी अनुदान मिळाले.

दीड वर्षांपूर्वी विहीर खोदली आणि ठाकूर निमगाव (ता. शेवगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी रामनाथ रतन खंडागळे यांनी बागायतदार होत कोरडवाहू शेतीवर मात केली. शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव परिसरात पाण्याची उपलब्धता कमी आहे. विहिरी, विंधनविहिरीच्या आधारे येथील शेतकरी पिके घेतात.

Agri Transformation
Transformer Repair : रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ऑइलचा तुटवडा

मात्र विहिरींचेही पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना मात्र अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. येथील रामनाथ रतन खंडागळे यांना पावणेचार एकर कोरडवाहू शेती. पावसावर अवलंबून राहत बाजरी, तूर आणि कापूस सारख्या कोरडवाहू पिकांचे उत्पादन घेत होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे व पेरणी केल्यावर वेळेवर पाऊस न झाल्यामुळे अनेक वेळी श्री. खंडागळे यांना नापीकतेला सामोरे जावे लागले.

शाश्वत सिंचन सुविधा असावी अशी त्यांचीही इच्छा असायची. मात्र जेमतेम उत्पादन, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विहीर खोदणे शक्य नव्हते.सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी शासन अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवते. कृषी विभागाने घेतलेल्या शेतकरी मेळाव्यातून खंडागळे यांना योजनेची माहिती मिळाली.

Agri Transformation
Rural School Transformation: कृतीयुक्त शिक्षणातून शाळेचा कायापालट

या योजनेतून विहीर खोदकामासाठी अडीच लाखांचे अनुदान दिले जात होते. शेवगाव पंचायत समितीकडे त्यांनी दोन योजनेसाठी अर्ज केला. कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, कृषी अधिकारी प्रमोद साळवे. पंचायत समिती शेवगावचे कृषी अधिकारी सारंग दुगम यांनी त्यांना याबाबत माहिती दिली.

ग्रामीण भागात विजेचा प्रश्न आहे. त्यात महावितरणकडून वीजजोडणी लवकर मिळत नसल्याने रामनाथ खंडागळे यांनी सौर कृषिपंप बसवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री पंप योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची सांगड घालून शंभर टक्के अनुदानावर सौरकृषी पंप बसवल्याने विजेचा प्रश्नही सुटला.

अनुदानात झाली वाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसह अन्य बाबींसाठी आठ महिन्यांपासून अनुदानात वाढ झाली आहे. आता नव्या विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान दिले जात आहे. शिवाय जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी एक लाख, पंपसंचाला पन्नास हजारांचे अनुदान मिळत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून सांगण्यात आले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com