Satpuda Greenery : सातपुड्याची हिरवळ नामशेष होण्याच्या मार्गावर

Satpuda Update : दरवर्षी यावल वनविभागाच्या क्षेत्रात वणवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी कोणताही ठोस उपाय होत नसल्याने सातपुडा वणव्यापासून सुरक्षित राहिला नाही.
Satpuda Greenery
Satpuda GreeneryAgrowon

Jalgaon News : दरवर्षी यावल वनविभागाच्या क्षेत्रात वणवे लागत आहेत. वणवे रोखण्यासाठी कोणताही ठोस उपाय होत नसल्याने सातपुडा वणव्यापासून सुरक्षित राहिला नाही, मात्र वनविभागाच्या हद्दीत वणवा लागल्याने यात वृक्षांची होळी होऊन कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचीही यानिमित्ताने राख सुरू आहे. शासकीय नियम फक्त कागदात बोलतात हेच खरे याचा अनुभव अशा अनेक घटनांतून समोर येतो.

वने वाचविण्यासाठी वनविभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती व संबंधित भागातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. वन विभागाच्या माध्यमातून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या होत्या, मात्र त्या समित्या कागदोपत्रीच राहिल्याचा प्रत्यय दिसून येतो आहे. सातपुड्यात वणवे पेटत आहेत. मागील महिनाभरात चार-पाच घटना यावल व अन्य वन क्षेत्रात आगीसंबंधी घडल्या आहेत.

Satpuda Greenery
Satpuda Nature Safari : सातपुड्याच्या जंगलात साकारतेय प्रति ‘ताडोबा’

यात वनसंपदेती अतोनात हानी झाली आहे. सातपुडा पर्वतात नंदुरबारातील शहादा, अक्राणी, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा भागांत विविध स्वयंसेवी संस्था, जागरूक मंडळी वनसंपदेच्या बचावासाठी काम करीत आहेत. परंतु या मंडळीला शासनाकडून सहकार्य, प्रोत्साहन हवे आहे. वन विभाग फक्त कारवाई व गस्त यापुरता मर्यादित दिसतो. परंतु गावागावांत जनजागृती, रोजगार यासाठी देखील सातपुड्यात काम व्हायला हवे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Satpuda Greenery
Fertilizer Stock : खरिपासाठी ४५ लाख टन खतसाठा मंजूर

सातपुड्यात आमराई, पळस, मोह आदी वृक्षसंपदा, वन क्षेत्र कमी होत आहे. जागरूक आदिवासी बांधव ही वनसंपदा सांभाळत आहेत. परंतु काही अपप्रवृत्तीदेखील फोफावली असून, यासंबंधी कारवाईसत्र उगारायला हवे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

वनसंपदेचा ऱ्हास

सातपुडा पर्वतात लहान-मोठी झाडेझुडपे, हिरवेगार गवत, वृक्षवेली असल्याने डोंगरावर ससे, तरस, माकड, लांडगा, कोल्हे, रानडुक्कर, लांडोर, मोर यांसारख्या लहान-मोठ्या प्राण्यांचा वावर असतो. मात्र वणव्यामुळे जंगलातील प्राणी, झाडेझुडपे, वनऔषधी वनस्पती होरपळून नष्ट होतात.

पक्ष्यांची अंडी, घरटी, पिले जळून नष्ट होतात. वन्य प्राण्यासह जीवसृष्टीचा ऱ्हास होत असून, तो टाळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वढोदा क्षेत्रात वाघाचा संचार आहे. या भागातही वनसंपदेची वृद्धी व्हायला हवी. त्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे. परंतु ग्रामस्थ, आदिवासी बांधव यांचा सहभाग वाढवून वन्यप्राणी, वनसंपदेचे जतन व्हायला हवे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com