Book Release Event: जातिवंत पशुधन ते आर्थिक व्यवस्थापन; डेअरी उद्योगासाठी मार्गदर्शक पुस्तक!

Dairy Farming Guidance: ‘ए टू झेड डेअरी फार्मिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात पार पडले. या पुस्तकात दूध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पशुधनाची योग्य निवड, गोठा व्यवस्थापन, आहार आणि आर्थिक नियोजन या महत्त्वाच्या बाबींचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे.
Book Release
Book ReleaseAgrowon
Published on
Updated on

Pune News: पशुधनाकडे केवळ जास्त दूध देणारे यंत्र म्हणून न बघता, त्यांचे निरोगी आरोग्य, आनुवंशिकता तसेच आर्थिक व्यवस्थापन याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. ‘ए टू झेड ः डेअरी फार्मिंग’ या पुस्तकातून दुग्ध व्यवसायातील जातिवंत पशुधन निवड ते आर्थिक व्यवस्थापन या सर्व बाबींची सखोल माहिती आहे. यामुळे हे पुस्तक पशुपालक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन ठरेल असा विश्‍वास पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी व्यक्त केला.

‘सकाळ’ प्रकाशनच्या वतीने डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित ‘ए टू झेड ः डेअरी फार्मिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. २१) डॉ. मुकणे यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘ॲग्रोवन’चे संचालक-संपादक आदिनाथ चव्हाण, पशुसंवर्धन विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, माजी सहाय्यक डॉ. व्यंकट घोरपडे, इंडो डेअरी असोसिएशनचे रवींद्र नवले, गोविंद डेअरीचे महाव्यवस्थापक शांताराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Book Release
Book Review: बांधावरच्या झाडांची सर्वांगसुंदर माहिती

डॉ. मुकणे म्हणाले, की पशुपालनामध्ये पशुधनाचा पौष्टिक आहार, गर्भधारणा आणि गोठा व्यवस्थापन हे सूत्र आर्थिक व्यवस्थापनासाठी गरजेच्या असतात. हे सर्व पाळले तर दूध व्यवसाय यशस्वी ठरतो. गोठा व्यवस्थापनात सर्वांत बारीक समजली जाणारे गव्हाणीची उंची आणि पशुधनाच्या मानेला मिळणारा आराम यांसारख्या बाबींची सचित्र माहिती देखील या पुस्तकामध्ये दिली आहे. यामुळे अत्यंत बारकावे या पुस्तकामध्ये असल्यामुळे हे पुस्तक पशुपालकांसाठी मार्गदर्शन ठरेल.

डॉ. परकाळे म्हणाले, की भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे नुसते म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रासाठी ‘ॲग्रोवन’ने सहज सोप्या भाषेत शास्त्र पटवून देणारे ज्ञानदानाचे प्रत्यक्षात काम केले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. पशुधनाच्या आनुवंशिक सुधारणेच्या पशुसंवर्धनाच्या योजनेला ‘ॲग्रोवन’ने गोठ्यापर्यंत नेले आहे.

Book Release
Tembhu Irrigation Scheme : ‘टेंभू’च्या पाण्यापासून आठ हजार हेक्टर वंचित

आदिनाथ चव्हाण म्हणाले, की शेती, पशुसंवर्धन हे विज्ञान आणि उद्योग आहे. विज्ञानाला उद्योगाची जोड दिली पाहिजे. ही जोड ‘ए टू झेड ः डेअरी फार्मिंग’ हे पुस्तक देईल. विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील बंदिस्त विज्ञान आणि ज्ञानाची तज्ज्ञांची भाषा सरळसोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम ‘ॲग्रोवन’ करीत आहे.

जगातील कृषी क्षेत्रात नवनवीन निरंतर बदल होत आहे. हे बदल तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. मात्र ज्ञानदानाचा हा वेग कमी असून, तो वाढविण्याचे काम ‘ॲग्रोवन’ करत आहे. प्रास्ताविक ‘सकाळ प्रकाशन’च्या अंजली इंगवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले. तर मनोगत आणि आभार लेखक डॉ. घोगळे आणि कुलकर्णी यांनी मानले.

‘ॲग्रोवन’ संदर्भ ग्रंथ

पशुसंवर्धन विभागाच्या बैठकीत सचिव रामास्वामी एन. यांनी ‘ॲग्रोवन’मधील पशुपालनावरील लेखांची कात्रणे ही पशुसंवर्धन विभाग आणि पशुपालकांसाठी संदर्भ ग्रंथ आहेत. असे कौतुक केल्याचे डॉ. मुकणे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com