Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

School Strawberry Party : चिखलदरा तालुक्यातील जैतादेही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्ट्रॉबेरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
Strawberry Party
Strawberry Party Agrowon

Amaravati News : चिखलदरा तालुक्यातील जैतादेही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्ट्रॉबेरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुलांनी प्रगतिशील शेतकरी मोथा येथील गजानन शनवारे यांनी पाठविलेल्या स्ट्रॉबेरीवर चांगलाच ताव मारला.

Strawberry Party
Strawberry Production : कमी पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका ; दीड महिना अगोदरच हंगाम संपणार

शेतकरी गजानन शनवारे यांनी आपल्या शेतातील सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या स्ट्रॉबेरीजची जवळपास १० किलोंची पेटी जैतादेही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद मिळावा, या हेतूने पाणी फाउंडेशनचे वैभव नायसे यांच्यामार्फत पाठविली. या स्ट्रॉबेरी महोत्सवाला गजानन शनवारे उपस्थित राहू शकले नाही.

त्यांच्या घरी लग्नसोहळा असतानासुद्धा विद्यार्थ्यांकरिता शेतात अगदी पहाटे जाऊन ताज्या स्ट्रॉबेरीज तोडून पाठविल्या. सोबतच धामणगावगढी येथील जोशी नर्सरीचे संचालक रमेश जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी क जीवनसत्त्वाने भरपूर असे आवळे भेट म्हणून आणले होते. विद्यार्थ्यांनी स्ट्रॉबेरी व आवळे या दोन्ही फळांवर मनसोक्त ताव मारला.

Strawberry Party
Strawberry Season : पाणी टंचाईमुळे स्‍ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात

या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. ही शाळा विद्यार्थ्यांकरिता वर्षभर ऋतूनुसार व फळांच्या हंगामानुसार मेजवानीचे आयोजन करते. यामध्ये टरबूज पार्टी, आंबा पार्टी, पपई पार्टी, हुरडा पार्टीचा समावेश असतो. गजानन शनवारे, रमेश जोशी, वैभव नायसे यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गणेश जामूनकर, जितेंद्र राठी, शुभांगी येवले यांनी आभार मानले.

अनोखी पार्टी

एकीकडे फास्टफूडच्या जमान्यात विद्यार्थी विदेशी खाद्यपदार्थ पसंत करीत आहेत. मेळघाटसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थी आपल्याच मातीत येणाऱ्या फळांचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे ही अनोखी संकल्पना असल्याचे मानले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com