Ahmedabad Flight Crash: अहमदाबादहून २४२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात

Air India Accident: अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला उड्डाणानंतर अवघ्या आठ मिनिटांत मेघानीनगर भागात भीषण अपघात झाला.
Air India Boeing 787 crash
Air India Boeing 787 crashAgrowon
Published on
Updated on

Pune News:अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा आज दुपारी मेघानीनगर परिसरात अपघात झाला. हे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अपघात झाला.अपघातानंतर मोठा स्फोट झाला असून, २४२ प्रवासी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

ही दुर्घटना गुजरातमधील अहमदाबाद शहरातील मेघानीनगर या दाट लोकवस्ती असलेल्या भागात घडली. हे ठिकाण सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे.

Air India Boeing 787 crash
Solapur Flight Service : सोलापूर विमानसेवेच्या मुहूर्तास २१ दिवस बाकी

हे विमान लंडनला जाण्यासाठी आज दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी अहमदाबाद येथून उड्डाण घेतले होते. मात्र, उड्डाणानंतर अवघ्या सात-आठ मिनिटांत, म्हणजे १ वाजून ३८ मिनिटांनी मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले.

अपघात घडताच परिसरात मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट दिसून आले. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे व बचावकार्य सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Air India Boeing 787 crash
Farmers Protest Maharashtra : मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही

या विमानात एकूण २४२ प्रवासी तर १० क्रु मेंबर प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतू प्राथमिक माहितीनुसार अपघातावेळी विमानाच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरलेल्या असल्याने मोठ्या प्रमाणावर स्फोट होऊन आग लागली असावी.  त्यामुळे या परिसरात मोठे नुकसान होऊन अनेक वाहने जळून खाक झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असून, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा तातडीने दाखल झाल्या आहेत. पुढील सुचना मिळेपर्यंत आता हे विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com