Millet Crop : भरडधान्याची पिके वाढून विकास होईल; नांदेड येथे मराठवाड्यातील भरडधान्य पिक परिषदेत तज्ज्ञांचा आशावाद

Millet Crop one day conference : मराठवाड्यातील भरडधान्य पिकाचे विशेषतः ज्वारी व बाजरी पिकाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची शिफारस कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे एक दिवसीय परिषदेत करण्यात आली आहे.
Millet Crop
Millet CropAgrowon

Pune News : मराठवाड्यातील भरडधान्य पिकाचे विशेषतः ज्वारी व बाजरी पिकाचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे एक दिवसीय परिषदेचे आयोजन शनिवारी (ता.११) करण्यात आले होते. या परिषदेत अनेक तज्ज्ञांनी भरड धान्य पिकाच्या पुनरुज्जीवनावर आपली मते मांडली. तसेच या तज्ज्ञांनी, भरडधान्य पिक वाढेल, विकासही होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी या परिषदेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अटारी पुणे संचालक डॉ. एस के रॉय, संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व अफार्म पुणे चेअरमन प्रमोद देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील संचालक शिक्षण डॉ.यु एम खोडके, संचालक संशोधन डॉ.खजिर बेग, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी एन गोखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड भाऊसाहेब बराटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंगोली राजेंद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषी विभाग नांदेड, आर.आर.ए नेटवर्क महाराष्ट्र व रिलायन्स फाउंडेशन, दिलासा जनविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून बारा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, निवडक शेतकरी व महिला व भरडधान्य प्रक्रिया उद्योजक यांचा सहभाग होता.

Millet Crop
Millet Crop : पुन्हा अवतरावे भरडधान्याचे युग

यावेळीमराठवाड्यातील ज्वारी व बाजरी हे प्रमुख भरडधान्य पीक असून मागील काही वर्षापासून ज्वारी व बाजरी पिकात घट होत असल्याचे समोर आले आहे. पेरणी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून आहारामधील वापर देखील अल्प प्रमाणावर आला आहे. यामुळे मानवी आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये ज्वारी व बाजरी पिकाच्या पुनर्जीवनासाठी, सुधारित वाणाचा वापर, ज्वारी काढणी व प्रर्कियेमध्ये यांत्रिकीकारणाचा वापर, भरडधान्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून भरडधान्य पिकातील विविध समस्या, आंतरपिक व मिश्रपिक पद्धतीचा वापर, प्रक्रिया उद्योग चालना व आहारातील समावेश वाढ ई. विविध विषयावर चर्चासत्र केली गेली.

Millet Crop
Millet Crop : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भरडधान्यउत्पादक शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष

या परिषदेमध्ये अनेक तज्ज्ञांनी आपली मते मांडली त्यात डॉ. परशुराम पत्रोलटी, प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय भरडधान्य संशोधन संस्था अंतर्गत ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर, ज्वारी संशोधन केंद्र परभणीचे चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल.एन जावळे, बायफ संस्थेकडून संजय पाटील, भरडधान्य प्रक्रिया उद्योजक एस एस भवानी फूड्स हैदराबाद कडून वीरशेट्टी पाटील मिलेट मॅन ऑफ तेलंगाना, कळसुबाई शेतकरी उत्पादक कंपनी नाशिककडून नीलिमा जोरवार, ऍग्रो झी ऑरगॅनिक कडून महेश लोंढे इत्यादी उद्योजकांनी आपले अनुभव सांगताना प्रक्रिया उद्योगातील संधी विशद केल्या.

तसेच आरआरए नेटवर्कचे समाधान बंगाळे व अनिकेत लिखार आणि उगम संस्थेकडून जयाजीराव पाईकराव यांनी आपले भरड धान्य विषयी अनुभव परिषदेसमोर मांडले.या आयोजित एक दिवसीय परिषदेत पुढील वर्षभरासाठी मराठवाड्यासाठी भरडधान्य पिकाचा विकास आराखडा तयार करण्यावर शिफारस करण्यात आली आहे. यासह उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योजकाला चालना, मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती व विक्री, व भरडधान्याचा आहारातील वापर वाढवणे, भरडधान्य पिकाचा जनावरांच्या चारा व इंधन म्हणून चालना देण्यावर चर्चा करण्यात आली असून एकमत झाले आहे.

याबरोबरच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी विकसित ज्वारी वाण परभणी शक्ती व बाजरा वान एएचबी १२६९ या बायोफोर्टीफाईड वाणाचे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रात्यक्षिक राबवणे, मजूर टंचाईवर मात करण्यासाठी ज्वारी व बाजरी कापणी यंत्र विकसित करणे, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बीज उत्पादन कार्यक्रम व प्रक्रिया उद्योजकाला चालना देणे, शासनाकडे सार्वजनिक वितरण प्रणाली च्या माध्यमातून रेशन दुकानातून कमीत कमी ५० टक्के भरड धान्याच्या पुरवठ्यासाठी शासनाकडे शिफारस करणे व भरडधान्य पीक विकसित करण्यासाठी एक वर्ष काम न करता कमीत कमी दहा वर्षासाठी आराखडा बनवण्यात यावा इत्यादी बाबीचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्वार संशोधन केंद्र परभणीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल एन जावळे यांनी केले. तर सर्वांचे आभार कृषी विज्ञान केंद्र सगरोळी प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे शास्त्रज्ञ प्रा.कपिल इंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कापूस संशोधन केंद्र नांदेड व कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे सर्व शास्त्रज्ञांनी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com