Fish Feeder : मत्स्य खाद्य वितरणासाठी उपयुक्त ‘फिश फीडर’ला पेटंट

Fisheries : पारंपरिक पद्धतीने मत्स्यतलावात माशांना खाद्य वितरणात कामात सुलभता नसणे, खाद्य देताना योग्य मात्रेचा अभाव यासह अधिक खाद्याचा अपव्यय अशा काही प्रमुख अडचणी होत्या.
Fish Feeder Patent
Fish Feeder Patent Agrowon

Nashik News : पारंपरिक पद्धतीने मत्स्यतलावात माशांना खाद्य वितरणात कामात सुलभता नसणे, खाद्य देताना योग्य मात्रेचा अभाव यासह अधिक खाद्याचा अपव्यय अशा काही प्रमुख अडचणी होत्या.

यावर पर्याय शोधून आधुनिक पद्धती विचारात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथील शास्त्रज्ञांनी मत्स्य खाद्य वितरणासाठी उपयुक्त व नावीन्यपूर्ण ‘फिश फिडर’ विकसित केला असून, त्यास पेटंट मिळाले आहे. यासाठी प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक वर्तक व साहाय्यक प्रकल्प प्रमुख डॉ. आशिष मोहिते, रवींद्र बोंद्रे यांनी कामगिरी केली.

पारंपरिक पद्धतीने खाद्य देताना गोणीचा वापर करून त्यामध्ये खाद्य टाकून ही गोणी दोरीला बांधून मत्स्यतलावात सोडली जाते. मात्र हे खाद्य गरजेपेक्षा अधिक जाणे, ते पाण्यात पडून तलावाच्या तळाशी जाऊन मातीच्या संपर्कात आल्यावर खराब होणे, यामध्ये पाणी व खाद्य खराब होण्यासह माशांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Fish Feeder Patent
Fishery Business : मच्छीमारी व्यवसाय अडचणीत

या बाबी विचारात घेऊन माशांना सुलभरीत्या खाद्याचे वितरण व तलावात माशांना खाद्य ग्रहण करता येईल, या सर्व बाबी विचारात घेऊन शास्त्रज्ञाने उपयुक्त अशी रचना तयार करून हा फिश फिडर बनविले.

‘फिश फिडर’ विकसित झाल्यानंतर पेटंटसाठी १३ एप्रिल २०१७ रोजी अर्ज करण्यात आला होता. या फिडरची तुलना अमेरिकेतील संशोधनांसोबत झाली होती. त्यामध्ये वेगळेपण व उपयुक्तता या बाबी विचारात घेऊन सात वर्षांनंतर हे पेटंट ग्रँट झाले आहे.

Fish Feeder Patent
Fisheries Employment Opportunity : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

हे ‘फिश फिडर’ संबंधित चाचण्या पनवेल व परिसरातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तलावात घेण्यात आल्या. खाद्य वितरण व्यवस्थापनात सुलभता येण्यासह खाद्य कुजण्याची समस्या कमी झाली. यामध्ये खाद्य तळाला जाऊन मातीच्या मिश्रणाबरोबर खराब होण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण फायदे आहेत.

पारंपरिक पद्धतीमध्ये माशांना खाद्य देताना खाद्याचे गोळे करून दिले जातात. यामध्ये १ किलो वजनाचा मासा तयार करण्यासाठी ३.५ किलो खाद्य असे गुणोत्तर असते. तर खाद्य तळाशी गेल्याने माशांना ते खाण्यात अडचणी निर्माण होतात. या फिडरमध्ये १ किलो वजनाचा मासा तयार होण्यासाठी १.५ ते २ किलो इतके खाद्य लागते. यातून उत्पादन खर्च कमी होऊन मत्स्य उत्पादकांना उत्पन्न वाढ ही साधने शक्य आहे.

‘कोकण विरा’असे नामकरण

खाद्य वितरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण असे फिश फिडर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले. त्यास पेटंट मिळाल्यानंतर विद्यापीठ संशोधन समितीने त्याचे नामकरण ‘कोकण विरा’ असे करण्यास मान्यता दिली आहे. येणाऱ्या काळात मत्स्य उत्पादकांना खाद्य वितरणासाठी ते योग्य किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

असे आहेत फायदे:

- फीडरच्या साहाय्याने जाळीदार पिशवीत खाद्य वर राहते, तळाशी जात नाही.

- खाद्य कुजत नाही. खाद्य योग्य मात्रेत देता येते.

- एखाद्या दिवशी खाद्य देणारे कुणी नसेल तर यात खाद्य टाकून ते मासे आवश्यक खाद्य ग्रहण करतात. खाद्याचा अपव्यय टळतो.

‘फिश फिडर’ वापरायला सोपे असून कमी खर्चिक असल्याने यांच्या वापराने खाद्य तलावात वाया न जाता खाद्याचा अपव्यय टळला जातो. त्यामुळे माशांच्या गरजेप्रमाणे मत्स्यखाद्य मिळाल्याने माशांची वाढ चांगली होऊन अतिरिक्त खांद्यांमुळे ढासळणारी पाण्याची गुणवता उत्तम राहाण्यास मदत होणार आहे, तसेच खाद्यावरचा खर्च कमी होणार आहे.
- डॉ. विवेक वर्तक, मत्स्य शास्त्रज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com