
Nanded News : कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेला नीटनेटकेपणा, योग्य वेळेची निवड, नवनवीन प्रयोग, बाजाराचा अभ्यास व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा आता महिलांनी देखील अभ्यास करावा. कृषी क्षेत्र देखील महिलांसाठी प्रगतीची नवी दिशा ठरू शकते, असे प्रतिपादन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी केले.
सगरोळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात गुरुवारी (ता. ३०) महिला मेळाव्यास त्या संबोधित करीत होत्या. या वेळी विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प्रणिता देवरे चिखलीकर, उद्योजिका चंद्रिका चव्हाण, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रियांका भालेराव, कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुप्रिया सोनजे, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होत्या.
कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून, तंत्रज्ञान युगात युवतींना अनेक संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून ड्रोन पायलट बनण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिली आहे, अशा अनेक योजना केंद्र व राज्य शासनातर्फे राबविल्या जात आहेत. त्यातून महिला आत्मनिर्भर, सक्षम व आरोग्यमय होतील, याची खात्री असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या.
आमदार चित्रा वाघ यांनी, हर घर शौचालय व लखपती दीदी अशा योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. नावासमोर आईचे नाव जोडून शासनाने महिलांचा सन्मान केला आहे. कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी एकशेबारा डायल करावा असे आवाहन केले. शासनाने
लखपती दिदिसाठी अकरा कोटी तर बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. महिलांनी उभारलेल्या प्रदर्शनींना भेटी देऊन संवाद साधला.
चंद्रिका चव्हाण यांनी महिलांसाठी उद्योगाच्या संधी, डॉ. भालेराव यांनी स्त्रियांचे आरोग्य व डॉ. सोनजे यांनी कर्करोग निदान व उपचार तर प्रा. कुलकर्णी यांनी, निरामय, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याचा कानमंत्र दिला. यावेळी या वेळी परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.