Brand Promotion : ब्रँडचा प्रसारासाठी नव्या संकल्पना

Brand Development : ब्रँडचा प्रभावीपणे बाजारात प्रसार करण्यासाठी प्रभावी योजना आखावी. दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे ठरवावीत. आपल्या ब्रँडची ओळख सतत कायम ठेवावी. त्यामध्ये सुधारणा करावी.
Brand Development
Brand DevelopmentAgrowon

डॉ. पल्लवी कोळेकर-देवकाते, रेश्मा शिंदे

Agriculture Product Branding :

आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये, गुणवत्ता आणि विविधता यांचे विश्‍लेषण करावे. बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांचा खर्च क्षमतेशी सुसंगत असेल अशी उत्पादनाची किंमत ठरवावी. उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी विविध योजना आखाव्यात.

ब्रॅण्ड ओळख

आपल्या ब्रॅण्डचे बाजारात वेगळेपण आणि लक्षात राहण्यासाठी दृश्यात्मक आणि भाषिक घटकांचा समावेश करावा. यामध्ये ब्रॅण्ड नाव, लोगो आणि ग्राफिक डिझाइन आणि टॅगलाइन यांचा समावेश होतो.

नाव निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे नाव ग्राहकांच्या मनात आपल्या ब्रॅण्डची पहिली छाप तयार करते.

ब्रॅण्ड नाव निवडताना

सहज उच्चारता येण्यासारखे आणि लक्षात राहणारे असावे.

स्पर्धकांच्या नावांपासून वेगळे असावे. ब्रॅण्ड मूल्ये आणि उद्दिष्टे प्रतिबिंबित करणारे असावे.

विविध भाषांमध्ये योग्य अर्थाने अनुकूल असावे. ट्रेडमार्क आणि डोमेन नाव उपलब्ध असावे.

लोगो आणि ग्राफिक डिझाइन ब्रॅण्डची दृश्यात्मक ओळख तयार करतात. हे घटक ग्राहकांच्या मनात ब्रॅण्डची छाप निर्माण करतात.

ब्रॅण्ड संदेश आणि संवाद

ब्रॅण्डचा मुख्य संदेश आणि संवाद प्रभावी असावा. हे आपल्या ग्राहकांशी मजबूत भावनात्मक आणि बौद्धिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे.

ब्रॅण्डची मुख्य संकल्पना आणि उद्दिष्टे स्पष्टपणे व्यक्त करणारा संदेश तयार करावा. हे संदेश ब्रॅण्डच्या मूल्यांशी सुसंगत असावेत. विविध ग्राहक गटांसाठी मुख्य संदेश तयार करावेत. हे संदेश ब्रॅण्डच्या विविध पैलूंना दर्शवतात, लक्षित ग्राहकांच्या गरजांना प्रतिसाद देतात.

संदेश साधा आणि स्पष्ट असावा. लक्षात राहणारा आणि प्रभावी असावा.

सर्व माध्यमांमध्ये संदेश सुसंगत असावा, ज्यामुळे ब्रॅण्डची ओळख निर्माण होते.

संदेशात भावनात्मक घटक असावा, ज्यामुळे ग्राहकांशी भावनिक संबंध प्रस्थापित होतात.

ब्रॅण्डचा प्रवास, मूल्य आणि उद्दिष्टांची कथा प्रभावीपणे सांगता येणे महत्त्वाचे आहे. हे ग्राहकांना आपल्या ब्रॅण्डशी जोडण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे.

ब्रॅण्डची स्थापना कशी झाली, तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला याची माहिती ग्राहकांना द्यावी.

ब्रॅण्डचे संस्थापक आणि त्यांच्या ध्येयांची कथा सांगावी. ज्यामुळे ग्राहकांना ब्रॅण्डच्या मागे असलेल्या लोकांबद्दल माहिती मिळते.

मूल्य आणि उद्दिष्टांची स्पष्टता ग्राहकांना सांगावी. ज्यामुळे ग्राहकांना ब्रॅण्डची तत्त्वे आणि ध्येयांचा अनुभव येतो.

ग्राहकांचे अनुभव सर्वांना सांगावेत. यामुळे इतर ग्राहकांना प्रेरणा मिळते. विश्‍वसनीयतेची भावना निर्माण होते.

Brand Development
Brand Development : ब्रॅण्ड विकसित करण्याचे टप्पे

ब्रँडचा प्रसार

ब्रँडचा प्रभावीपणे बाजारात प्रसार करण्यासाठी प्रभावी योजना आखावी.

दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे ठरवावीत. उदाहरणार्थ, विक्री वाढवणे, ब्रँडची ओळख वाढवणे किंवा नवीन बाजारपेठ मिळवणे.

लक्षित ग्राहकांची ओळख पटवावी. त्यांना आकर्षित करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. यासाठी बाजारपेठेची निवड महत्त्वाची गोष्ट आहे. उत्पादन वितरणासाठी विक्री ठिकाणांचे नियोजन करावे.

आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये, गुणवत्ता आणि विविधता यांचे विश्‍लेषण करावे.

बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांचा खर्च क्षमतेशी सुसंगत असेल अशी उत्पादनाची किंमत ठरवावी.

उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी विविध योजना आखाव्यात.

नाविन्यपूर्ण प्रसार प्लॅटफॉर्मवर ब्रँडचा प्रसार करावा.

वेबसाइटला उच्च स्थान मिळविण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञान वापरावे.

लक्षित ग्राहकांना नियमित ई-मेलद्वारे ब्रँडची नवीन उत्पादने आणि योजनांची माहिती द्यावी.

ब्लॉग, व्हिडिओ, इन्फोग्राफिक्स इत्यादीद्वारे उत्पादनाची माहिती तयार करावी.

विविध माध्यमांचा वापर करून ब्रँडची जाहिरात करावी. टीव्ही, वर्तमान पत्र, मासिक, रेडिओ, सोशल मीडिया, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर याचबरोबरीने लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर जाहिरात मोहीम चालवावी. गुगल सर्च इंजिनवर व्यावसायिक जाहिरातीद्वारे आपल्या वेबसाइटकडे ग्राहकांना आकर्षित करावे.

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या माध्यमातून ब्रँडची जाहिरात करावी.

नवीन उत्पादनांची बाजारात चर्चा होण्यासाठी विशेष समारंभ आयोजित करावेत. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन ब्रँडची ओळख वाढवावी.

Brand Development
Bharat Brand : केंद्र सरकारला ग्राहकांचा कळवळा

ब्रँड व्यवस्थापन आणि देखरेख

ब्रँड व्यवस्थापन आणि देखरेख म्हणजे आपल्या ब्रँडची ओळख सतत कायम ठेवावी. त्यामध्ये सुधारणा करावी.

उत्पादनांमध्ये एकसारखेपणा राखावा. यामुळे ग्राहकांना प्रत्येक वेळी ब्रँडचा एकसारखा अनुभव मिळतो.

संपूर्ण ब्रँड गाइडलाइन तयार करावी. यामध्ये लोगो, रंग योजना, फॉन्ट्स, टोन ऑफ व्हॉइस आणि इतर दृश्यात्मक घटकांची नियमावली असते.

कर्मचाऱ्यांना ब्रँड गाइडलाइनचे पालन कसे करायचे याचे प्रशिक्षण द्यावे. यामुळे एकसारखेपणा राखला जातो.

विक्री सामग्री, सोशल मीडिया पोस्ट्स, वेबसाइट कंटेंट आणि ग्राहकांशी संवाद एकसारखा असावा.

उत्पादनांची तपासणी आणि नियमित आढावा घ्यावा.

ग्राहकांच्या प्रतिसादानुसार उत्पादन आणि सेवांमध्ये सुधारणा करावी.

ब्रँडची स्थिती आणि प्रतिमेचा नियमितपणे आढावा घ्यावा.

ब्रँड पुनर्निर्माण

ब्रँड पुनर्निर्माण म्हणजे जुना ब्रँड पुन्हा नव्याने बाजारपेठेत आणून ग्राहकांसमोर आकर्षकपणे सादर करावा. यामध्ये नाव, लोगो किंवा संपूर्ण ओळख बदलणे समाविष्ट आहे. टॅगलाइनमध्ये बदल करावा. नवीन रंग योजना, टायपोग्राफी आणि ग्राफिक तयार करावे.

ब्रँडच्या मुख्य संदेश आणि संवाद शैलीत बदल करावा. ज्यामुळे ब्रँडचे संप्रेषण अधिक प्रभावी होते.

नवीन विक्री धोरण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ब्रँडला नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावे.

कर्मचाऱ्यांना नवीन ब्रँड ओळखीबद्दल प्रशिक्षण द्यावे. बाजारातील स्पर्धेत टिकण्यासाठी ब्रँडला नव्या दिशेला न्यावे. नव्या बाजारातील बदलानुसार ब्रँडला अद्ययावत करावे.

नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन आणि सेवांची गुणवत्ता सुधारणा करावी.

पर्यावरणीय आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून ब्रँडच्या धोरणांमध्ये बदल करावा.

नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करून ब्रँडला जागतिक स्तरावर विस्तारित करावे.

प्रतिस्पर्ध्यांच्या धोरणांचे विश्लेषण करून आपल्या ब्रँडच्या धोरणांमध्ये सुधारणा करावी.

नव्या संधींचा लाभ घेऊन ब्रँडचा विस्तार करावा. नवीन धोरणाच्या अनुसरणामुळे विक्री आणि महसूल वाढवणे शक्य होते.

डॉ. पल्लवी कोळेकर- देवकाते, ९९२१९०९२७०

(कृषी अर्थशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, बारामती, जि. पुणे)

डॉ. आर. व्ही. चव्हाण, ९२८४५४२७८५

(सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य पीजीआय शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com