Brand Development : ब्रॅण्ड विकसित करण्याचे टप्पे

Agriculture Products Branding : ब्रॅण्डमुळे उत्पादनास योग्य किंमत मिळते. उच्च गुणवत्ता अपेक्षित असते. ब्रॅण्ड विकसित करण्यामध्ये गॅरंटी, वॉरंटीसारख्या विक्रीनंतरच्या सेवांची मोठी भूमिका असते, ज्याद्वारे उत्पादनाबद्दल ग्राहकांच्या मनात विश्‍वास निर्माण होतो.
Product Branding
Product BrandingAgrowon

डॉ. पल्लवी कोळेकर-देवकाते, रेश्मा शिंदे

Brand Development Strategy : ब्रॅण्ड ही कंपनीने आपल्या उत्पादनांना दिलेली ओळख आहे. उत्पादनाचे नाव, लोगो आणि ट्रेडमार्क आदींच्या रूपात ब्रॅण्ड प्रदर्शित केला जातो. आज अनेक गोष्टी त्यांच्या वास्तविक नावांऐवजी ब्रॅण्ड नावाने ओळखल्या जातात.

काही उत्पादने अशी आहेत ज्यांच्या कंपन्यांची नावेच त्या उत्पादनांच्या नावांमध्ये स्थापित झाली आहेत. ब्रॅण्ड हे उत्पादन कंपनीचे नाव आणि ‘लोगो’चे मिश्रण आहे. यामुळे ग्राहकांमध्ये त्या उत्पादनाचा संबंध निर्माण होतो. ब्रॅण्डची ओळख कंपनीच्या लोगो आणि मोनोग्रामद्वारे होते.

ब्रॅण्डिंगचे महत्त्व

‘ब्रॅण्ड’च्या विकासामुळे ग्राहकांच्या मनात कंपनीच्या गुणवत्तेची, मूल्याची आणि विश्‍वासाची सातत्यपूर्णता कायम राखण्यास मदत होते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, यामध्ये ब्रॅण्डच्या एकूण प्रतिमेला सुधारण्यासाठी छोटे बदल केले जातात. ज्यामुळे ग्राहकांशी असलेला संपर्क कायम राहतो. कंपनी किंवा एकूण धोरण आणि दृष्टिकोनाशी सुसंगत राहण्यास मदत होते.

ब्रॅण्डमुळे उत्पादनास योग्य किंमत मिळते. उच्च गुणवत्ता अपेक्षित असते. ब्रॅण्ड विकसित करण्यामध्ये गॅरंटी, वॉरंटीसारख्या विक्रीनंतरच्या सेवांची मोठी भूमिका असते, ज्याद्वारे उत्पादनाबद्दल ग्राहकांच्या मनात विश्‍वास निर्माण केला जातो.

गेल्या काही वर्षांत ठरावीक वस्तू ब्रॅण्डसह मिळत होत्या, जसे की वाहन, कपाट, साबण, तेल, बूट आणि चहा. पण बदलत्या काळात कपडे, सोने, हिरे याचबरोबरीने अन्नपदार्थ जसे की तांदूळ, पीठ, डाळ, तेल, मीठ, साखर, चिकन आणि भाजीपाला देखील आता ब्रॅण्डसह विकला जात आहे. याचबरोबरीने अंडी, मांस आणि फळे देखील ब्रॅण्डच्या नावाने विकण्यास सुरुवात झाली आहे.

Product Branding
Bharat Brand : केंद्र सरकारला शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांची काळजी; शेतमालाचे भाव पाडण्याचा नवा डाव!

गुणवत्ता महत्त्वाची

ग्राहक ब्रॅण्ड पाहून उत्पादन विकत घेतात कारण ते उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल निश्‍चित असतात. गुणवत्ता म्हणजे ठरलेल्या मानकांनुसार उत्पादन असणे महत्त्वाचे आहे. ग्राहक ब्रॅण्ड उत्पादने विकत घेतात, कारण त्यांना सर्वोत्कृष्ट उत्पादने वापरत असल्याचा अभिमान वाटतो आणि इतरांपेक्षा वेगळे असल्याची भावना मिळते.

जाहिरात आणि सादरीकरण ब्रॅण्ड निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे नवीन ग्राहक आकर्षित होतात. गॅरंटी आणि वॉरंटी या बाबी विक्रीनंतरच्या सेवांच्या श्रेणीत येतात. जर कंपनी उत्पादन विकल्यानंतर त्याची खात्री देते आणि कोणतीही त्रुटी असल्यास ती दुरुस्त करत असेल तरच ग्राहक त्या उत्पादनावर विश्‍वास ठेवतात.

हाच विश्‍वास ग्राहकांचा संबंध मजबूत करतो. काही वेळा ग्राहक एक ब्रॅण्ड खरेदी केल्यानंतर दुसऱ्या ब्रॅण्डमध्ये असलेल्या सुविधांचा लाभ न मिळवू शकण्याची निराशा अनुभवतो. गॅरंटी आणि वॉरंटी या भावनांना कमी करण्यात आणि खरेदी केलेल्या ब्रॅण्डबद्दल आपुलकी वाढविण्यात मोठी भूमिका बजावतात.

ब्रॅण्ड विकासाची प्रक्रिया

संशोधन आणि विश्लेषण ब्रॅण्ड विकासाच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे संशोधन आणि विश्लेषण. या टप्प्यात बाजारातील स्थिती, ग्राहकांची गरज आणि स्वतःच्या कंपनीची ओळख समजून घेण्यासाठी सखोल अभ्यास करतो. यामध्ये दोन मुख्य घटक आहेत बाजार संशोधन आणि स्वत:ची ओळख.

बाजार संशोधन

लक्षित ग्राहकांची विशेष गरजा आणि अपेक्षा काय आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये समस्या, आवड-निवड, खरेदी करण्याची सवय आणि त्यांना उत्पादन, सेवेमध्ये काय हवे आहे याचा अभ्यास केला जातो. सर्व्हेक्षण, फोकस ग्रुप आणि ग्राहकांची मागणी गोळा करून त्यांच्या अनुभवांचे विश्‍लेषण करावे. यामुळे आपल्याला उत्पादन किंवा सेवा कशी सुधारता येईल हे कळते.

Product Branding
Natural Farming : पंधरा वर्षांपासून जोपासलाय नैसर्गिक शेतीचा आदर्श

प्रतिस्पर्धी विश्‍लेषण

बाजारातील आपल्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांची ओळख पटवणे आवश्यक आहे.

व्यवसायाचे विश्‍लेषण

प्रतिस्पर्ध्यांची ताकद, कमकुवतपणा, संधी, धोके समजून घ्यावेत.

यूएसपी विश्‍लेषण

प्रतिस्पर्ध्यांच्या युनिक सेलिंग प्रोपोजिशन समजून घ्यावे. आपल्याला त्यांच्यापेक्षा कसे वेगळे करता येईल याचा विचार करावा.

बाजारातील ट्रेण्ड

उद्योगात नवीन ट्रेण्ड, तंत्रज्ञानातील प्रगती, आणि बदलते ग्राहक तसेच व्यवहार समजून घ्यावेत. भविष्यात कोणत्या संधी आहेत, याचा अंदाज घ्यावा.

ओळख

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आणि ध्येय स्पष्ट करावे. कंपनी काय सेवा देते आणि कशासाठी कार्य करते हे सांगणे आवश्यक आहे. कंपनीची मूलभूत मूल्ये आणि तत्त्वे निर्धारित करावीत.

ग्राहक आणि बाजारासाठी महत्त्व असलेल्या मूल्यांची ओळख पटवावी.

ब्रॅण्ड रणनीती

आपल्या ब्रॅण्डला प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कसे वेगळे आणि आकर्षक बनवता येईल हे ठरवावे. हे एक विशिष्ट वैशिष्ट्य, सेवा किंवा गुणवत्ता असू शकते जे ग्राहकांना आकर्षित करते.

प्रतिस्पर्ध्यांचे बाजारपेठेतील स्थान आणि उत्पादनाशी तुलना करून, आपल्या ब्रॅण्डचे विशिष्ट स्थान निश्‍चित करू शकतो. ग्राहकांना दिले जाणारे मूल्य आणि लाभ स्पष्ट करावा.

ब्रॅण्डचे दीर्घकाळ ध्येय ठरवावे. हे ध्येय ब्रॅण्डची वाढ, विक्री आणि बाजारातील स्थितीच्या संदर्भात असू शकते.

लघुकाळातील उद्दिष्टांची यादी तयार करावी, ज्यामुळे आपले दीर्घकाळ ध्येय साध्य होईल.

ब्रॅण्ड उत्पादन किंवा सेवांचा प्रमुख ग्राहक गट तयार करावा. ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी आणि वर्तनाचे विश्‍लेषण करावे.

लोगो निर्मिती

साधा आणि स्पष्ट असावा, यामुळे तो लहान आकारात ओळखता येईल.

उद्दिष्टे, मूल्ये प्रतिबिंबित करणारा असावा. योग्य रंग योजना, फॉन्ट निवड ब्रॅण्डची ओळख आणि गरज दर्शवतात.

विविध माध्यमांमध्ये वापरता येण्यासारखा असावा, जसे की प्रिंट, डिजिटल.

ब्रॅण्डसाठी विशिष्ट रंग योजना तयार करावी, जे भावनात्मक आणि मानसशास्त्रीय प्रभाव निर्माण करतात.

टॅगलाइन

कंपनीची मूलभूत संकल्पना व्यक्त करणारे छोटे वाक्य. हे वाक्य ब्रॅण्डचे मुख्य संदेश स्पष्टपणे व्यक्त करतात.

साधी, लहान आणि लक्षात राहणारी असावी.

ब्रॅण्डची मूळ कल्पना, उद्दिष्टे, आणि मूल्ये व्यक्त करणारी असावी.

भावनात्मक आकर्षण असावे, ज्यामुळे ग्राहकांशी भावनिक संबंध प्रस्थापित होतात.

डॉ. पल्लवी कोळेकर- देवकाते, ९९२१९०९२७०, रेश्मा शिंदे, ९६२३३८३८७९, (कृषी अर्थशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, बारामती, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com