Healthy Giloy : आरोग्यदायी, गुणकारी गुळवेल

Importance of Giloy : शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास वारंवार सर्दी-पडसे ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे दिसतात. गुळवेलाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींना गुळवेळीमुळे फायदा होतो.
Gulvel
Gulvel Agrowon

डॉ. अनिल घोरबांड, डॉ. एकनाथ शिंदे

Health Benefit of Gulvel : गुळवेल ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेलाचे वाळलेले खोड व पानाचे चूर्ण औषध निर्मितीकरिता उपयोगात आणतात. करंगळी एवढ्या जाडीचे एक फूट लांब तुकडा बारीक करून त्यात पाच, दहा तुळशीची पाने मिसळावीत.

हे सर्व घटक दोन कप पाण्यात एक चतुर्थांश म्हणजे अर्धा कप होईपर्यंत आटवावेत. त्यानंतर गाळूनत्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे. हे करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आपल्या प्रकृतीनुसार गुळवेलीचे प्रमाण ठेवणे आवश्यक आहे.

Gulvel
Healthy Tamarind : आरोग्यदायी, गुणकारी चिंच

फायदे :

गुळवेल ज्वरनाशक आहे. डेंगी, चिकुन गुनिया, फ्लू, स्वाइन फ्लू इत्यादी आजारांवर उपाय आहे. डेंगीसारखे तापामध्ये रुग्णाच्या रक्तातील श्‍वेत रक्त पेशीचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना गुळवेलापासून तयार केलेले औषध दिल्यास रक्त पेशी लवकर सामान्य होतात.

शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास वारंवार सर्दी-पडसे ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे दिसतात. गुळवेलाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींना गुळवेलीमुळे फायदा होतो.

Gulvel
Healthy Diet : अन्न ही प्राणिमात्रांची मूलभूत गरज

गुळवेलीमुळे मधुमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह, अंधत्व इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यकृतातून रक्तप्रवाहात जी शर्करा मिसळली जाते, त्या इन्शुलिनची चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण रोखले जाते. त्याचा मधुमेहींना चांगला उपयोग होतो.

संधिवात आणि वातव्याधीवर उपयोगी आहे. शक्तिवर्धक व वाजीकर आहे, मानसिक व्याधींवर उपयोगी आहे. गुळवेल रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि रक्त शर्करेचे प्रमाण कमी करते, मूळव्याध विकारांवर उपयोगी ही एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.

गुळवेल संग्राहक, मूत्रजनन ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे. ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वात यावर उपयुक्त आहे. रक्तसुधारक असून पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व उपयोगी आहे.

गुळवेलीने भूक लागते, अन्न पचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते.

डॉ. अनिल घोरबांड, ७९७२२७७१८३, (अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, मालेगाव, जि. नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com