Delhi Farmers
Delhi FarmersAgrowon

Delhi Farmers Protest : शंभू सीमेवरून १०१ शेतकऱ्यांचा ‘जथा’ दिल्लीकडे कूच करणार

Farmer Issue : शंभू सीमेवरील निषेध स्थळावरून शुक्रवारी दुपारी १ वाजता १०१ शेतकऱ्यांचा ‘जथा’ दिल्लीकडे कूच करेल, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी गुरुवारी (ता. ५) सांगितले.
Published on

Chandigarh News : शंभू सीमेवरील निषेध स्थळावरून शुक्रवारी दुपारी १ वाजता १०१ शेतकऱ्यांचा ‘जथा’ दिल्लीकडे कूच करेल, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी गुरुवारी (ता. ५) सांगितले. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली जमलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वी पिकांच्या किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी आणि त्यांच्या इतर अनेक मागण्यांसाठी राष्ट्रीय राजधानीत पायी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियानामधील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत.

शंभू सीमेवर पत्रकार परिषदेत पंढेर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा जथा दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे. सरकारला काय करायचे, हे सरकार ठरवेल. आम्ही दुपारी १ वाजता शंभू सीमेवरून दिल्लीच्या दिशेने मोर्चाला सुरुवात करू. आता सरकारने शेतकऱ्यांना मोर्चे काढण्यापासून रोखले तर हा त्यांचा ‘नैतिक विजय’ असेल,’’ असे ते म्हणाले. सतनाम सिंग पन्नू, सुरिंदर सिंह चौटाला, सुरजित सिंग फुल आणि बलजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला ‘जथा’ असेल, अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती.

Delhi Farmers
Delhi Farmers' Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा 'दिल्ली चलो'चा एल्गार!, दिल्लीच्या सीमा बंद

हरियानातील अंबाला पोलिसांनी शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी केला आणि अंबाला जिल्हा पोलिस प्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षेचे मूल्यांकन करण्यासाठी सीमेवर पाठवले. हरियाना सीमेवर केंद्रीय निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाने यापूर्वीच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू केले आहे,

Delhi Farmers
Delhi Farmer Protest : ‘एमएसपी’साठी पुन्हा‘चलो दिल्ली’चा नारा !

सर्वनसिंह पंधेर यांनी पत्रकारांना सांगितले, ‘‘हरियानातील खानौरी सीमेवरून मोर्चा काढण्याची अद्याप कोणतीही योजना नाही, तरीही तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आदल्या दिवशी पोलिस उपमहानिरीक्षक मनदीप सिंग सिद्धू (पटियाला रेंज) आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक नानक सिंग यांनी पंढेर आणि सुरजित सिंग फुल यांची शंभू सीमेवर भेट घेतली. सिद्धू म्हणाले, की शेतकऱ्यांनी पोलिसांना आश्वासन दिले आहे की ते शांततेत मोर्चात सामील होतील. ट्रॅक्टर-ट्रॉली घेणार नाहीत. ते पायी जातील. ऑलिंपिक कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे भारतीय किसान मजदूर युनियनचे नेते गुरमितसिंह चढुनी आणि ऑल इंडिया किसान सभेचे नेते हन्नन मोल्ला यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com