Cow Farming : रशियातील पदवीधर बनला सह्याद्रीतील गोपालक

Success Story : विद्युतशास्त्रात पदवी आणि पुन्हा रशियात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सांगलीचे शेतकरीपुत्र विवेक कुंभोजकर यांनी स्वतःचे करिअर घडविले आयटी क्षेत्रात आणि आता ते रमले आहेत चक्क गोपालनात..!
Dairy Business
Dairy Business Agrowon

Pune News : विद्युतशास्त्रात पदवी आणि पुन्हा रशियात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सांगलीचे शेतकरीपुत्र विवेक कुंभोजकर यांनी स्वतःचे करिअर घडविले आयटी क्षेत्रात आणि आता ते रमले आहेत चक्क गोपालनात..!

कोकणातील डेअरी क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी कुंभोजकर आदर्श बनले आहेत. गीर, कंकरेज, साहिवाल आणि कोकण गिड्डा अशा अस्सल १७५ गायींचे चार ठिकाणी गोठे सांभाळणारे कुंभोजकर पुणे व मुंबईत रोज ३०० ग्राहकांना ‘विप्र’ ब्रॅंडने निर्भेळ देशी पिशवीबंद दूध पुरवतात. श्रमाच्या मोबदल्यात प्रतिलिटर १०० रुपये दर ते घेतात आणि ग्राहकदेखील आनंदाने विकत घेतात.

Dairy Business
Gir Cow Farming : जातिवंत ‘गीर’ संगोपनातून वाढवला दुग्धव्यवसाय

रायगड जिल्ह्याच्या मंडणगड डोंगररांगांमध्ये दहागाव घराडी भागात कुंभोजकर यांनी ‘विप्र कृषी उद्योग’ थाटला आहे. चारही गोशाळांमध्ये स्वच्छता आणि अत्याधुनिक छोटी दुग्धशाळा हे त्यांच्या कृषी उद्योगाचे वैशिष्ट्य आहे. ‘‘मी तसा आयटी क्षेत्रातला. कोकणात डोंगरात संसार थाटला खरा; पण पत्नी शिल्पाला कर्करोग झाला. त्यामुळे मी अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषदेचा सदस्य बनलो.

पत्नीला विकिरणाचे (केमो) घातक उपचार न देता केवळ देशी दूध, वनौषधी आणि पथ्यपाण्यावर आम्ही दहा वर्षे कर्करोगाला झुंज दिली होती. मात्र, कोविडनंतर कुणी तरी सल्ला दिला की केमो करा. अखेर त्यातच पत्नी कायमची सोडून गेली,’’ अशी कहाणी कुंभोजकर सांगतात. विप्र गोशाळा आधी शिल्पा कुंभोजकर सांभाळत होत्या. पुणे व रायगड अशा दोन्ही ठिकाणी राहून कुंभोजकर दांपत्य दुग्धशाळा चालवत होते. आता मात्र एकटे कुंभोजकर संघर्ष करीत आहेत.

शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे, असे सांगणाऱ्या कुंभोजकरांनी गोशाळे व्यतिरिक्त फळशेतीतदेखील स्वतःला झोकून दिले आहे. त्यांनी ६०० झाडांची काजू शेती, ३५० झाडांची आंबा बाग आणि ३०० झाडांचे मोहवन उभारले आहे. ‘‘जातिवंत देशी गायींसाठी मी देशभर भटकतो.

Dairy Business
Cow Farming : शेवगाव तालुक्यातील परमेश्वर देशमुख यांचे गोपालन

गायींच्या अभ्यासासाठी मी राजस्थानला जाऊन राहिलो. माझ्याकडे १६ जातिवंत वळू आहेत. आयटीची नोकरी करताना मी खूप हुशार असल्याचे वाटत होते. पण, एकदा गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना त्याचे ज्ञान पाहून मी थक्क झालो. मला माझे अज्ञान कळले व मी शेतकरी झालो,’’ असे विवेक कुंभोजकर (९९२२ ४८८०१९) अगदी प्रांजळपणे सांगतात.

एव्हरेस्टवर जाण्याचे स्वप्न

दऱ्याखोऱ्यात राहून विवेक कुंभोजकर काटक बनले आहेत. एव्हरेस्टवर जाण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ‘‘मी आता पन्नाशी पार करीत असलो तरी जीसीआयएम या संस्थेमार्फत गिर्यारोहणाची पदविका पूर्ण करतो आहे. घरातच गिर्यारोहणाची कृत्रिम भिंत उभारली आहे. गिर्यारोहणातील ज्येष्ठ उषःप्रभा पागे, आनंद पाळंदे, उमेश झिरपे यांना मी गुरुस्थानी मानतो,’’ असे कुंभोजकर सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com