Cow Dung Shortage : शेणखताला सोन्याचा दर, पशुधन कमी झाल्याचा फटका

Animal Shortage : जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा-पाणी मिळणे कठीण जात असल्याने पशुधनाअभावी दिवसेंदिवस शेणखताचा साठा कमी होत आहे.
Cow Dung Shortage
Cow Dung Shortageagrowon

Kolhapur Fertilizer Rate : रासायनिक खतांचे वाढते दर आणि त्यामुळे होणारा पिकांवरील परिणाम याला पर्याय म्हणून शेतकरी एका बाजूला शेणखताची मागणी करत असताना दिवसेंदिवस जनावरांची संख्या घटत चालल्याने शेणखतही दुर्मीळ होऊ लागले आहे. त्यामुळे शेणखताची मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना वाहतुकीचा व खत पसरण्याचा खर्चही वेगळा करावा लागत आहे. परिणामी शेती खर्चात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात असलेले पशुधन आता कमी झाले आहे. जिल्ह्यात हजारो एकर शेती विविध प्रकल्पांच्या नावाने गेली. तसेच आणखी जाण्याचे मार्गही आहेत. सर्वत्र जमिनीचे होत असलेले सपाटीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाने घेतलेल्या वेगामुळे जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा-पाणी मिळणे कठीण जात असल्याने पशुधनाअभावी दिवसेंदिवस शेणखताचा साठा कमी होत आहे.

सद्यःस्थितीत शेणखताचा भाव प्रति ट्रॅक्टर ट्रॉली २२०० ते २५०० रुपयांवर गेला आहे. बरेच शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळतात. शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचाही वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Cow Dung Shortage
Organic Fertilizer Adulteration : रसायनांची भेसळ करीत विकली जातात जैविक खते

शेणखत जमिनीच्या आरोग्यासाठी पूरक कार्य करते. त्याच्या नियमित वापराने जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्म सुधारतात. सेंद्रिय कर्ब वाढतो.

झाडात पांढऱ्या मुळांची वाढ झाल्याने संजीवके चांगल्या प्रकारे तयार होतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पूर्वी कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच जनावरे मोठ्या प्रमाणात पाळत होते. आता पशुधन कमी होत आहे, त्यामुळे पुरेसा चारा मिळत नाही.

दुभत्या जनावरांची वाढलेले भरमसाट दर, जनावरे बांधण्यासाठी जागा नसणे, कष्ट न घेणे अशा अनेक कारणांमुळे पशुपालनाकडे शेतकरी दुर्लक्ष करत असल्याने शेणखत मिळणे दुरापास्त होत चालले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com