Health Facilities Fund: आरोग्य सुविधांसाठी १७६ कोटींवर निधी

Bharati Pawar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला केंद्र आणि राज्य शासनामार्फत आरोग्य सुविधांसाठी १७६.५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
Bharati Pawar
Bharati PawarAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला केंद्र आणि राज्य शासनामार्फत आरोग्य सुविधांसाठी १७६.५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यंत्रणांनी केंद्र शासनाच्या आवास, आरोग्य तसेच आदिवासी विकास योजनेतर्गंत आरोग्य व आवास सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (ता. ३) दिले.

डॉ. श्रीमती पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, प्रकल्प संचालक देवकन्या बोकडे, आरोग्य उपसंचालक डॉ. भुषणकुमार रामटेके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे आदी उपस्थित होते.

Bharati Pawar
Agriculture Marketing : कृषी विपणन व्यवस्थेमध्ये बदलाची गरज

बैठकीत डॉ. पवार यांनी आयुष्मान भारत योजना, आयुष मिशन, विकसित भारत संकल्प यात्रा, शबरी आवास योजना आदी योजनांचा आढावा घेतला. बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, आवास योजना या उपक्रमासाठी राज्य व केंद्राचे अनुदान प्राप्त व वितरितही झाले आहे.

त्यातील जमीन उपलब्ध असलेल्या १०९८ लाभार्थ्यांना शासन मंजुरी प्राप्त असून ३७५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. २६७ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. कर्जसंलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी लाभार्थ्यांनी थेट बॅंकेत अर्ज दाखल करणे अपेक्षित आहे.

Bharati Pawar
Horticulture Fund : साहित्याचे दर वाढल्याने फलोत्पादनात निधी खर्च होईना

त्यानुसार १२ हजार २५३ जणांना जिल्हा अग्रणी बॅंकेने कर्ज दिलेल्या एकूण १३ हजार ३५१ नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. परवडणारी घरे या योजनेत महानगर पालिकेने ५ ठिकाणी घरासाठी जागा निश्चित केल्या आहेत. घर निमिर्तीचे कार्यादेश दिले आहेत. यामुळे लवकर महापालिका ११ हजार १२० घरे नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.

डॉ. श्रीमती पवार म्हणाल्या, की केंद्र शासनाने दिलेल्या निधीचा पूर्ण विनियोग व्हावा. आदिवासी विकास विभागानेही दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करावी व लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचवावा. शबरी आवास योजनेअंतर्गत प्रलंबित प्रस्तावांचा आढावाही त्यांनी घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com