Water Scheme : माळशिरसमधील सात गावच्या पाणी योजनांचा ‘सीईओं’नी सोडवला प्रश्न

Water Issue Solved by CEO : मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या सात गावांतील सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांची माळशिरस पंचायत समितीत बैठक घेऊन या सातही गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला.
Water Scheme
Water Scheme Agrowon
Published on
Updated on

Solapur News : जलजीवन मिशनमधून माळशिरस तालुक्यातील पठाणवस्ती, भांब, येळीव व पुरंदावडे गावांसाठी योजना पाणी योजना मंजूर होती. परंतु काम सुरू होत नव्हते. त्याशिवाय फडतरी, सदाशिवनगर, मारकडवाडी (ता. माळशिरस) या गावात काम सुरू होते,

परंतु कामाला गती नव्हती. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या सात गावांतील सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांची माळशिरस पंचायत समितीत बैठक घेऊन या सातही गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला.

Water Scheme
Water Supply Scheme : समांतर जलवाहिनीचा शिल्लक १४५ कोटी निधी त्वरित अदा होणार

मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी नुकताच माळशिरस तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जलजीवन मिशनसह माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. माळशिरस तालुक्यातील बोंडले, वेळापूर, पानीव, झंजेवाडी, मोटेवाडी या गावांमधील जलजीवन मिशनच्या कामांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर माळशिरस पंचायत समितीमध्ये पाहणी केली. पानीव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन इमारतीच्या कामाची गुणवत्ता पूर्ण होत असल्याची खात्री केली. इमारतीचे काम गुणवत्तेचे करा, फेब्रुवारीअखेर पर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी दिली.

Water Scheme
Water Supply Scheme : मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजजोड पूर्ववत

तसेच या सातही गावांतील जलजीवनच्या कामातील अडचणी, त्यावरील उपायांवर सरपंच, ग्रामसेवकांशी चर्चा केली आणि त्यातल्या अडचणी दूर करत तातडीने ही कामे सुरू करण्याचे आदेश दिले.

आरोग्य केंद्रांची केली पाहणी

माळशिरस दौऱ्यात वेळापूर, पानीवसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची पाहणी केली. औषध भांडार, ऑनलाइन औषध प्रणाली व सर्व रजिस्टरची स्वतः खातर जमा करून औषधसाठा तपासला. बाह्यरुग्ण तपासणी विभाग, प्रसूतिगृह, ऑपरेशन थिएटर व शौचालये, परिसर, निवासस्थाने यांना भेट देऊन पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com