Cabinet Meeting : बांबू लागवडीस अनुदान तर संपूर्ण राज्यात राबवणार मधाचे गाव योजना; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

State Cabinet Meeting : राज्यातील विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आज सोमवार (५ रोजी) महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच विविध प्रश्न मार्गी लावणारे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Cabinet Meeting
Cabinet MeetingAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या आठवड्या विविध कारणामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली नव्हती. यामुळे या आठवड्यात शिंदे सरकार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्याप्रमाणे आज सोमवार (५ रोजी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिगृहात पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच यावर निर्णय देखील घेतले गेले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही

राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार

Cabinet Meeting
Artificial Insemination : जनावरांचे कृत्रिम रेतन येणार कायद्याच्या कक्षेत ; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार

उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार

मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी

बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार

शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार

सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता

बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार

Cabinet Meeting
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता

तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार

नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय

गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com