Pomegranate
PomegranateAgrowon

Pomegranate Rate : आळेफाटा येथे ७ हजारांना डाळिंबाचे एक क्रेट

Pomegranate Market : ‘‘आळेफाटा बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला ७ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे.’’
Published on

Alephata News : ‘‘आळेफाटा बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला ७ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे,’’ अशी माहिती अध्यक्ष संजय काळे यांनी दिली. या वेळी संचालक नबाजी घाडगे, सचिव रूपेश कवडे, व्यवस्थापक प्रशांत महाबरे उपस्थित होते. .

Pomegranate
Pomegranate Farming : डाळिंब शेतीत लौकिक मिळविलेली गौडवाडी

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या उपबाजारात कांद्याप्रमाणे आता डाळिंबाचे दररोज लिलाव होऊ लागले आहेत. यामध्ये गुरुवारी एक नंबर डाळिंबास २० किलोच्या एका क्रेटला तब्बल ७ हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

Pomegranate
Pomegranate Flower Drop : ढगाळ हवामानामुळे डाळिंब बागांत फूलगळ

त्या खालोखाल दोन नंबरच्या एका क्रेटला ५ हजार रुपये, तीन नंबरच्या वीस किलोच्या क्रेटला ४ हजार रुपये, तर चार नंबरच्या क्रेटला ३ हजार रुपयांचा दर मिळाला. या वेळी मार्केटमध्ये १००६ क्रेट डाळिंबांची आवक झाली.

या बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर, नगर या ठिकाणांहून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी आले. पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजारपेठ ठरत आहे, अशी माहिती डाळिंब आडतदार प्रवीण लेंडे, विशाल कुटे, पप्पू सरोदे, संदीप लोढा, गणेश गडगे, निशिकांत ढोमसे, शैलेश जाधव यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com