Black Market Fertilizers : निविष्ठांचा काळा बाजार करणाऱ्यांवर करडी नजर

Fertilizers Bogus : यंदाच्या (२०२५) खरिपात शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा रास्त भावात, योग्य वेळी, योग्य किमतीत मागणीप्रमाणे मिळाव्यात यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
Black Market Fertilizers
Black Market Fertilizersagrowon
Published on
Updated on

Parbhani : यंदाच्या (२०२५) खरिपात शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा रास्त भावात, योग्य वेळी, योग्य किमतीत मागणीप्रमाणे मिळाव्यात यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. खते, बियाण्याची जास्त दराने विक्री, साठेबाजी करून काळाबाजार करणाऱ्यांवर कृषी विभागाची करडी नजर राहणार असून त्यादृष्टीने जिल्हास्तरावर १ व तालुका स्तरावर ९ असे एकूण १० भरारी पथके स्थापन करण्यात आली. जिल्हा तसेच तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख जिल्हा कृषी विकास अधिकारी असून त्यात उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी, वजनमापे निरीक्षक सदस्य तर जिल्हा गुणवत्ता निरिक्षक सदस्य सचिव आहेत. तालुकास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख संबंधित तालुका कृषी अधिकारी असून कृषी अधिकारी, वजनमापे निरिक्षक, मंडळ कृषी अधिकारी सदस्य तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण निरिक्षक) सदस्य सचिव आहेत.

Black Market Fertilizers
Pre-Monsoon Rains Parbhani : पूर्वमोसमी पावसाचा ४७१ हेक्टरवरील पिकांना तडाखा

यंदाच्या (२०२५) खरीप हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीनच्या २ लाख क्विंटलवर बियाण्यांची, तर कपाशीच्या ११ लाख ४३ हजार ३६८ बियाणे पाकिटांची गरज आहे.

भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे. निविष्ठा खरेदीच्या अनुषंगाने काही तक्रार, अडचण असल्यास आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, पंचायत समिती, संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com