Water Extraction : पाझर तलावातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर लगाम

Illegal Extraction of Water: जिल्हा परिषदेच्या अंजनखेडा पाझर तलावातून अवैधपणे उपसा करणाऱ्या तीन विद्युत मोटारीसह पाइप, केबल जप्त करण्यात आले.
Water Extraction
Water ExtractionAgrowon

Washim News : जिल्हा परिषदेच्या अंजनखेडा पाझर तलावातून अवैधपणे उपसा करणाऱ्या तीन विद्युत मोटारीसह पाइप, केबल जप्त करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकार वैभव वाघमारे यांनी पथकासह रात्री उशिरा भेट देऊन पाहणी केली. या वेळी ही कारवाई करण्यात आली.

गावाच्या परिसरातील विहिरी तसेच इतर पाण्याच्या स्रोतांची पाणीपातळी वाढावी आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, या हेतूने वाशीम तालुक्यात २८ आणि जिल्ह्यात ८४ पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

Water Extraction
Water Extraction : फुपनगरीत पूररेषेत कूपनलिकांद्वारे बेसुमार पाणीउपसा सुरू

या तलावातून कोणीही पाणी उपसा करू शकत नाही. मात्र, काही लोक अवैधरीत्या पाझर तलावातून पाणी उपसा करीत असल्याची तक्रार प्रशासनाकडे आली होती. पाझर तलावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याबाबत तसेच पाझर तलावावरून अवैधपणे पाणी उपसा होत असल्याबाबत वारंवार आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वाघमारे यांनी रात्री उशिरा अंजनखेडा येथील पाझर तलावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. भेटी दरम्यान पाझर तलावातून अवैधपणे पाणी उपसा होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी जागेवरच कारवाई केली.

Water Extraction
Sand Extraction : पैनगंगा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा

याबाबत जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ अभियंत्यांना आठ दिवसांची मुभा देण्यात आली असून त्यांनी कोणत्याही पाझर तलावावर अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्यास तो पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले.

अन्यथा संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी व संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी संदेश चवरे, कनिष्ठ अभियंता आर. एन. इंगळे व नागरिक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com