Illegal water abstraction : लातूर जिल्ह्यात अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर भरारी पथकांची करडी नजर

Latur Water shortage : राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा अवैधरित्या उपसा होण्याची शक्यता आहे. तर लातूर जिल्ह्यातील पाण्याच्या अवैध उपस्याला रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Pune News : राज्यातील अनेक जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली असून दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. यामुळे विविध जिल्ह्यात सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर जो पाणी साठा शिल्लक आहे तो फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र या पाण्याचे अवैधरित्या उपसा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने लातूर जिल्ह्यात विशेष काळजी घेण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाण्याच्या अवैध उपस्याला रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच पाण्याच्या अवैध उपसा करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. या सूचना त्यांनी आढावा बैठकीत केल्या.  

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ उपस्थित होते. तसेच पाटबंधारे विभाग, पशुसंवर्धन विभाग, महानगरपालिका, तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांनी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. 

Water Shortage
Water shortage : छत्रपती संभाजी नगर, बीड, यवतमाळला पाणी टंचाईच्या झळा; मुंबईकरांच्या चिंतेतही वाढ

सध्या लातूरसह राज्यात छोट्या-मोठ्या धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर एका हांड्यासाठी महिला वर्गाला पायपीट करावी लागत आहे. यामुळे विविध जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. 

दरम्यान लातूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून येथे प्रमुख जलाशयातील पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र येथे पाण्याचा अवैधरित्या उपसा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी थेट दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. 

Water Shortage
Water shortage in Karnataka : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पाणीबाणी, १४ हजारपैकी ७ हजार बोअरवेल पडले बंद

ही भरारी फथके जिल्ह्यातील धरणे, जलाशयांच्या शेजरी असतील. जलसंपदा किंवा जलसंधारण विभाग शाखा अभियंता, महावितरण शाखा अभियंता, महसूल मंडळ अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश या पथकात असेल.

पाण्याचा अपव्यय टाळा

दरम्यान जिल्ह्यात पाणी टंचाई लक्षात घेता सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर धरण आणि जलाशयातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तर पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. 'यामुळे कोणीही पाण्याचा अवैध उपसा करू नये. नागरिकांनी पाणी टंचाई पाहता पाण्याचा अपव्यय टाळून, काटकसरीने वापर करावा', असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी केले आहे. 

कारवाई सुरू ८६ विद्युतपंप जप्त 

या दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाईचा बडगा पथकाने उचलला असून पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पथकाने आतापर्यंत ८६ विद्युतपंप जप्त करत ८७५ वीज कनेक्शन तोडली आहेत. तसेच १३८ विद्युत स्टार्टर, १०९ वायर बंडल देखील पथकाने जप्त केली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com