Pune News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याआधी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेताना सत्ता आमच्या महाविकास आघाडीकडे द्या, आम्ही ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करू, अशी ग्वाही दिली. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी गुरुवारी (ता.१४) आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
राहुल गांधी यांची बुलढाण्यातील चिखली येथील सभा विमानातील तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाली होती. यावेळी त्यांनी जनतेची माफी मागितली होती. यानंतर त्यांनी व्हिसीद्वारे तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत चर्चा केली होती. या चर्चेतून राहुल गांधी यांनी कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केंद्रातील भाजप सरकारने आणि राज्यातील महायुतीने शेतकऱ्यांचे मोठे नकसान केले आहे. सत्तेवर येताना अनेक आश्वासने दिली. मात्र ती पूर्ण केली गेली नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
यावेळी उपस्थित सोयाबीन शेतकऱ्याने एका एकरात ६ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले असून सध्य स्थितीत ३००० हजार भाव मिळत आहे. तर उत्पादन खर्च २३ ते २४ हजार झाला आहे. आता सोयाबीन विकल्यास १८ हजार रूपये येतील. म्हणजेच ६ हजार रूपयांचे नुकसान आहे. यामुळे अशावेळी आम्ही आमच्या मुलाबाळांचे कसे संगोपन करायचे? त्यांच्या पोटाला काय घालायचे? असा सवाल करताना व्यथा मांडली आहे.
केंद्र सरकारने सोयाबीनला हमीभाव ४ हजार ८०० दिला आहे. पण हमीवावर खरेदी कोणीच करत नाही. यावरून राहुल गांधी यांनी कागदावर सत्य असून ते सत्यात नसल्या सारखे असल्याचा टोला भाजपला लगावला आहे.
यावेळी एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेने देखील आपली समस्या राहुल गांधी यांनी सांगितली. कर्जामुळे तिच्या पतीने आत्महत्या केली असून फक्त ३ लाखांच्या कर्जापोटी त्याला टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे सांगितले. आता त्या कर्जाचे ७ ते ८ लाख झाले असून मुलाबाळांचा सांभाळ करणे कठिण झाल्याचेही ती महिला म्हणाली.
राहुल गांधी यांनी, मविआ असो किंवा इंडिया आघाडी सत्तेत आल्यास त्यांच्याकडे शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे अशी विचारणा केली. यावर शेतकऱ्यांनी कर्जमाफी देण्यासह इतर शेतकरी योजना द्याव्यात, असे म्हटले.
देशातील भाजप सरकारने फक्त २० ते २५ कोट्याधिशांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केलं. पण शेतकऱ्यांचा नवा पैसा माफ केला नाही. यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमाल, सोयाबीन, धान आणि कापसाला हमीभाव मिळायला हवा अशा आमची इच्छा आहे. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली
तसेच राहुल गांधी यांनी राज्यातील सोयाबिन लागवडीसाठी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल खर्च येतो. पण त्याला केवळ ३ हजार रुपयांचा दर मिळतो. याचा अर्थ क्विंटलमागे १ हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न सोडाच भाजपने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने शेतमाल दराने विक्री करण्यास मजबूर केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.