Shirdhon News : केंद्र सरकारच्या दोलायमान अवस्थेतील निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात असल्याचे कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.
नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि.साईनगर रांजणी च्या कामगार संघटना आणि संचालकांची बैठक झाली सदर बैठकी मध्ये बोनस बाबत चर्चा होऊन कर्मचाऱ्यांना दिवाळीसण आनंदाने साजरा करता यावा यासाठी कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी कर्मचाऱ्यांना २६ टक्के बोनस देण्यात येईल असे सांगताच कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जल्लोष करून कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले.
यावेळी बोलताना ठोंबरे म्हणाले, की मराठवाड्यातील साखर उद्योग उसाची उपलब्धता व पाणी टंचाई या दोन्ही समस्यांनी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षाच्या दुष्काळाच्या खाईत सापडलेला मराठवाड्यातील साखर उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले असून तो नफ्यात आणण्याचे कौशल्य साध्य केले आहे.
आणि ते केवळ साखर कारखान्या बरोबरच उपपदार्थ निर्मिती मधून आणि कर्मचारी व ऊस उत्पादकांचे सहकार्या मधून मला जे कांही द्यावयाचे आहे ते माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कर्मचारी बांधवांनाच द्यावयाचे आहे, असे त्यांनी यावेळी सभेमध्ये सांगितले.
चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने मांजरा धरण भरले व त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये उसाची लागवड मोठया प्रमाणात होत असले मुळे व्यवस्थापनाने निर्धारित केलेले सात लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.