प्रा. राईलकरः हाडाचा शिक्षक आणि गणिती

काही व्यक्तींच्या या जगातून जाण्याने आपण विलक्षण हळहळतो. एका स्नेह्याकडून समजले की शुक्रवारी (३१/०८/२०२२) प्रा. मनोहर राईलकर सरांचे पुण्यात निधन झाले.
Prof. Manohar Railkar
Prof. Manohar RailkarAgrowon

काही व्यक्तींच्या या जगातून जाण्याने आपण विलक्षण हळहळतो. एका स्नेह्याकडून समजले की शुक्रवारी (३१/०८/२०२२) प्रा. मनोहर राईलकर सरांचे पुण्यात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गणित आणि संख्याशास्त्र या दोन विषयांत एमएस्सी केल्यावर त्यांनी पुण्याच्या एसपी कॉलेजात ३४ वर्षे गणिताचे अध्यापन केले. पैकी २९ वर्षे ते गणित विभागाचे शाखा प्रमुख होते. त्यानंतर शेवटची आठ वर्षे ते विज्ञान शाखा प्रमुख आणि कॉलेजचे उपप्राचार्य होते.

Prof. Manohar Railkar
Cotton Rate: कापसाऐवजी पाॅलिस्टरला का वाढतेय पसंती?

बालभारतीच्या गणित समितीवर व मा. शा. प. मंडळाच्या गणित अभ्यास मंडऴावरही अकरा-बारा वर्षे काम केलं. महाविद्यालयात कनिष्ठ आणि वरिष्ठ वर्गांना गणित शिकवलं. एकवीस वर्षं एमएस्सीलाही गणित शिकवलं. काही वर्षांपूर्वी मी गणितातील कॅल्क्युलस या भागाचा अभ्यास करताना मला ‘ग्यानबाचं कॅल्क्युलस’ हे पुस्तक राईलकर सरांनी लिहिलंय हे समजलं. ते पुस्तक मिळवण्यासाठी मी बराच आटापिटा केला होता. कारण कॅल्क्युलस सारखा विषय नाटकात लिहितो तसे संवाद लिहून कसा बरं तयार केला असेल? हे मोठं कुतूहल मला होतं.

Prof. Manohar Railkar
Soybean Rate : दर पाडण्यासाठीच वायदे बंदीला ‘सोपा’चे समर्थन

राईलकर सरांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी थोर ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्या ‘Introduction to mathematical philosophy’ या पुस्तकाचा ‘गणिती तत्वज्ञानाचा परिचय’ नावाने अनुवादही केला होता. सरांनी निवृत्तीनंतर गणित विषयाला जणू वाहूनच घेतलं होतं. गणित, विज्ञान हे विषय मराठी या आपल्या मातृभाषेतून शिकवावेत यासाठी ते आयुष्यभर आग्रही होते. राईलकर सरांनी लिहिलेला ‘शिक्षणाला लवकर आरंभ केल्याने आपल्या मुलांना काय लाभ होतो?’ हा लेख मुलांना लवकर शाळेत घालण्याची घाई झालेल्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

आजकाल तीन साडेतीन वर्षांची मुलं झाली की पालकांना इतकी घाई होते मुलांना शाळेत घालण्याची की विचारता सोय नाही. अशा पालकांनी हा वरील लेख आवर्जून वाचावा असा आहे. राईलकर सर एकदा म्हणाले, की शाळा सुटल्यावर मुलांना घरी जाताना मी जेव्हा माझ्या गॅलरीतून पाहतो तेव्हा मला फार वाईट वाटतं. कारण, शाळा सुटल्यावर मुलांना घरी जाण्याची प्रचंड घाई झालेली असते. घरी जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. याचा अर्थच असा झालाय की आज आम्ही या मुलांना शाळा नावाच्या कोंडमाऱ्यात अडकवून टाकलंय जणू!’’ अशा या मोठ्या लोकांची दखल समाज म्हणून आपण कधी घेणार आहोत की नाही?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com