Cotton
Cotton Agrowon

Cotton Rate: कापसाऐवजी पाॅलिस्टरला का वाढतेय पसंती?

कापूस उत्पादन घटीचा पाॅलिस्टरला मिळतोय फायदा

व्यापाऱ्यांच्या बंदने शेतकरी कोंडीत

हळदीच्या वायद्यांवर (Turmeric Futures) बंदी घालण्याच्या मागणीसाठी नांदेड आणि हिंगोली येथील व्यापाऱ्यांनी पाच दिवस बाजार बंद ठेवला आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी नहमीप्रमाणं शेतकर्‍यांना वेठीस धरलंय. व्यापार्‍यांनी बाजार बंद (Bajar Band) न करता आपल्या मागण्या संबधीतांकडे मांडाव्यात, अशी सुचना नांदेड जिल्हा उपनिबंधकांनी केली होती. मात्र व्यापारी बाजार समिती प्रशासनालाही न जुमानता मनमानी कारभार करत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. सध्या बाजारात हळदीला (Turmeric Rates) ६ हजार ३०० ते ७ हजार २०० रुपये दर मिळतोय. मात्र पुढील पाच दिवस बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना हळद विकता येणार नाही. तर सणांच्या काळात मागणी वाढल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलंय.

मधू मक्याचा दर टिकून

स्वीट कॉर्न (Sweet Corn) अर्थात मधू मक्याचा दर टिकून आहे. सध्या मधू मक्याला १००० ते १८०० रुपये दर मिळतोय. पावसामुळं मधू मक्याचं अनेक भागांमध्ये नुकसान झालं. तसंच काही भागांमध्ये कीड-रोगाचाही प्रादुर्भाव जाणवतोय. परिणामी बाजारातील आवक मर्यादीत आहे. सध्या पुणे आणि मुंबईसारख्या बाजारात २०० ते ३०० क्विंटल आवक होतेय. इतर बाजार समित्यांमधील आवक ही सरासरी ५० क्विंटलच्या दरम्यान आहे. पुढील महिनाभर मक्याचा हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर मका दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton
Heavy Rain : निफाड तालुक्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीसदृश पाऊस

दुधी भोपळ्याचे दर तेजीत

बाजार समित्यांमध्ये सध्या दुधी भोपळ्याची आवक कमी होत आहे. मोठ्या बाजार समित्या वगळता दैनंदिन आवक ही २० ते ४० क्विंटलच्या दरम्यान होतेय. आवकेचा दबाव दूर झाल्यामुळं दुधी भोपळ्याच्या दरात सुधारणा झाली आहे. मागील काही दिवसांपासून दुधी भोपळ्याचे दर वाढलेले आहेत. सध्या दुधी भोपळ्याला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळतोय. पुढील काही दिवस दुधी भोपळ्याची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

उडदाला यंदा चांगला दर मिळण्याची शक्यता

देशातील काही बाजारांमध्ये नव्या उडदाची आवक सुरु झाली. मात्र ही आवक नगण्य आहे. तर नव्या उडदामध्ये ओलावा खूपच अधिक येतोय. त्यामुळं नव्या उडदाचा दरही काहीसा कमी आहे. सध्या नव्या उडदाला ६ हजार ६०० रुपये ते ७ हजार २०० रुपयांचा दर मिळतोय. तर जन्या उडदाचे ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयाने व्यवहार होत आहेत. उडदाची आवक वाढल्यानंतर दरावर काहीसा दबाव येऊ शकतो. यंदा घटलेला पेरा, पिकाचं नुकसान आणि वाढलेल्या मागणीमुळं दर तेजीत राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton
Lumpy Skin : सांगली जिल्ह्यात सहा जनावरांना ‘लम्पी’

कापसाऐवजी पाॅलिस्टरला का वाढतेय पसंती?

जगातील कापूस पिकाला (Cotton Crop) बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसतोय. त्यामुळं कापूस उत्पादनावरही (Cotton Production) परिणाम होत आहे. त्यामुळं कापसापासून निर्मित कापडाचं उत्पादन कमी होतंय. तर पाॅलिस्टरच्या कापडाचं (Polyester Fabric) उत्पादन वाढतंय. जगात २०१५ मध्ये २४० लाख टन कापड कापसापासून निर्माण झालं होतं. तर २०२० मध्ये २२७ लाख टनांपर्यंत कमी झालं. या पाच वर्षांमध्ये कापूस पिकावर पाऊस आणि दुष्काळाचा परिणाम झाला. त्यामुळं जागतिक कापूस उत्पादन काहीसं कमी राहीलं. त्यामुळं कापड उत्पादनही (Cotton Fabric) घटलं. मात्र २०२१ मध्ये कापसापासून निर्मित कापडाचं उत्पादन २६० लाख टनांवर पोचलं. तर २०२५ पर्यंत या कापडाचं उत्पादन २७० लाख टनांपर्यंत पोचेल, असा अंदाज आहे. कापड उत्पादनातील ही वाढ अत्यंत कमी आहे. त्यातुलनेत पाॅलिस्टरच्या कपड्यांना अलिकडच्या काळात पसंती वाढली आहे. २०१५ पर्यंत ४४६ लाख टन पाॅलिस्टर कापडाचं उत्पादन मागीलवर्षी ५५७ लाख टनांवर पोचलं. म्हणजेच पाॅलिस्टरच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. कापसाचं उत्पादन घटलं आणि दर वाढले की कापड उद्योग पाॅलिस्टरचा वापर वाढवतात. याचा अनुभव जागतिक पातळीवर चालू हंगामातही आला. कापसाचे भाव १ लाख गाठी प्रतिखंडी झाल्यानंतर पालिस्टरचा वापर वाढला होता. यंदाही जागतिक कापूस उत्पादन कमी राहून दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. नव्या हंगामात कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com