Election Voting Tamilnadu : मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या तामिळनाडूच्या १० शेतकऱ्यांवर आजामीनपात्र गुन्हा दाखल!

द न्यूज मिनिटच्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, सुंदरमूर्ती नावाचा एका सरकारी अधिकाऱ्याने १९ एप्रिल रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सरकारी कर्मचारी आणि आंदोलक कुटुंबांना मतदान करण्यास सांगण्यासाठी आला होता. यावेळी गावकऱ्यांनी अधिकाऱ्याला नकार दिला.
Election Voting
Election Voting Agrowon
Published on
Updated on

तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात परांदूर येथील ग्रीनफील्ड विमानतळाला विरोध करत मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या १० शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. १९ एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी परांदूरच्या एकनापूरमधील मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या १० शेतकऱ्यांवर अजामीनपत्र कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यत आला.

परांदूर येथे ग्रीनफील्ड विमानतळ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी एक हजार एकर अतिरिक्त जमीन संपादित करण्यात येणार असल्याचा सरकारने आदेश दिला होता. तामिळनाडू सरकारच्या या आदेशानंतर शेतकऱ्यांची अधिकची जमीन प्रकल्पात जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

Election Voting
Punjab Farmer Protest : पंजाबमध्ये भाजपच्या उमेदवारांना शेतकऱ्यांचा विरोध का? |पीक विमा योजनेत तीन राज्य सहभागी होणार?

द न्यूज मिनिटच्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, सुंदरमूर्ती नावाचा एका सरकारी अधिकाऱ्याने १९ एप्रिल रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सरकारी कर्मचारी आणि आंदोलक कुटुंबांना मतदान करण्यास सांगण्यासाठी आला होता. यावेळी गावकऱ्यांनी अधिकाऱ्याला नकार दिला. त्यावरून गावकरी आणि अधिकाऱ्यात वादही झडले. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, २९४ (ब), ३३२, ३४१ आणि ३५३ कलमाखाली दहा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यानुसार २२ एप्रिल रजी सुंगुवरछत्रम पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिस पाठवण्यात आली.

दरम्यान, परांदूर येथील विमानतळाच्या प्रकल्पासाठी सुरुवातीला ४ हजार ८७० एकर जमीन संपादित करण्यात येणार होती. त्यामध्ये एकनापुरम आणि परांदूरसह १२ गावांचा समावेश होता. परंतु २०२३ मध्ये नव्याने सरकारने आदेश देत २० गावांतील ५ हजार ७४६ एकर जमीन संपादित करण्याची सूचना काढली. त्यानंतर शेतकऱ्यांनी तामिळनाडू सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com