Tur Market : अकोला बाजार समितीत तूर सरासरी ९६०० रुपये

Tur Rate : या हंगामातील तुरीची काढणी जोमाने सुरू असून बाजारातील आवकही सुधारलेली आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

Akola News : या हंगामातील तुरीची काढणी जोमाने सुरू असून बाजारातील आवकही सुधारलेली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीला सरासरी ९६०० पर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळतो आहे.

या हंगामात सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून जिल्ह्यात तुरीची मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली होती. पिकाला सुरुवातीला पावसाचा खंड बाधक ठरला. त्यानंतरच्या काळात सिंचन क्षेत्रातील तुरीला नोव्हेंबर अखेरीचा मॉन्सूनोत्तर पाऊस नुकसानकारक राहिला. त्यानंतर सतत धुके पडल्याचा परिणाम तुरीच्या उत्पादनात नुकसानकारक होता.

Tur Market
Tur Market : हिंगोलीत तुरीचे कमाल दर दहा हजार रुपयांवर

अशा सर्व संकटांतून शिल्लक राहिलेले उत्पादन शेतकरी काढून बाजारात विक्रीला नेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजारांमध्ये सध्या तूर विक्रीची लगबग सुरू आहे. अकोला या मध्यवर्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर सध्या कमाल १० हजार ५०० पर्यंत विकते आहे.

Tur Market
Tur Rate : महिला गटाने तुरीला मिळविला १०१२५ रुपये दर

तर किमान दर आठ हजारांपर्यंत मिळत आहे. बाजारातील आवकही दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त होत आहे. तुरीच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीचा हात आखडता घेतला आहे.

अकोल्यात सोयाबीन कमाल ४३६० रुपये

सोयाबीनचे दर कमालीचे दबावात असून सरासरी दर ४३०० च्या आत पोचला आहे. बाजारात सोयाबीन या हंगामात मागील काही दिवसांत पाच हजारांवर गेलेली नाही. आता तर किमान दर ४ हजारांपासून सुरू होत आहे.

कमाल दरही ४४०० च्या आतच मिळतो आहे. यामुळे सोयाबीनची आवक कमी झाली. सध्या दोन हजार क्विंटलच्या आत ही आवक आली आहे. शेतकरी सोयाबीनच्या दरवाढीची अपेक्षा ठेवून थांबलेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com