
Palghar News : राज्य सरकारने पालघर जिल्ह्यासाठी निर्धारित केलेल्या मुद्रांक शुल्क इष्टांकापैकी ९६ टक्के वसुली करण्याची कामगिरी जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाने केली आहे. १,५५० कोटी रुपये वसूल करण्याचा इष्टांक असताना मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षात एकूण १,४९८ कोटी राज्याच्या तिजोरीत जमा केले आहेत. गेल्या वर्षीच्या १,१०० कोटींच्या तुलनेत मुद्रांक शुल्क वसुली ३३ टक्क्यांनी वाढली. जिल्ह्यात वाढवण बंदर, विमानतळ यासारखे नवनवीन प्रकल्प येऊ घातल्याने आगामी काळात मुद्रांक शुल्क वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या आर्थिक वर्षात पालघर जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाकडे एकूण ९४ हजार ४४५ दस्तऐवज नोंदणी करण्यात आले, ज्यामुळे १,४९८ कोटींचा महसूल गोळा करण्यात आला. पालघर जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांमुळे चौदाशे कोटींपेक्षा अधिकच्या रकमेचा महसूल गोळा करण्यात मुद्रांक शुल्क विभागाला शक्य झाले.
मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील यांनी जिल्ह्यातील दस्त नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. मुद्रांक शुल्क विभागअंतर्गत रबावलेले उपक्रम आणि जिल्ह्यात विविध राष्ट्रीय प्रकल्पांमुळे मुद्रांक शुल्क वसुली रकमेत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत. परिणामी सरकारी तिजोरीमध्ये महसूल वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
शासकीय उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न
जिल्हा प्रशासन आणि मुद्रांक शुल्क विभागाने दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेला ऑनलाइन सुविधा आणि जनजागृतीमुळे करदात्यांचा सहभाग वाढला. तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय प्रकल्पामुळे मुद्रांक वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पालघर जिल्ह्यात मुद्रांक शुल्क माध्यमातून महसुलाच्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्याच्या विकासात मुद्रांक शुल्कअंतर्गत मिळणारा महसूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
पालघर जिल्ह्यात मुंबई-बडोदा दृतगती महामार्ग, बुलेट ट्रेन, लोकल रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण, विरार-अलिबाग कॉरिडोर यासारखे प्रकल्प आणि वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आणि विमानतळाच्या घोषणेमुळे दस्त नोंदणीची संख्येत वाढ झाली आहे. तसेच मुंबई शहर जवळ असल्याने नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. भविष्यात दस्त नोंदणीत वाढ होणार असून, जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क विभागाकडून पक्षकारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- दीपक पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी, पालघर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.