
Green Innovation: बियांच्या अंकुरणाची प्रक्रिया रोखणाऱ्या संप्रेरकाचे काम काही प्रमाणात थांबवून अंकुरणाला चालना देण्याचे काम नायट्रेट कशा प्रकारे करते, या शोध चायनीज शास्त्र अॅकेडमीच्या क्षीशुआंगबन्ना ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन, चीन शास्त्र आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आणि हुनान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी घेतला आहे. त्यामुळे अॅबसिसिक अॅसिड आणि नायट्रेट यांच्या कार्यामध्ये असलेला हा विरुद्धधर्मी संबंध स्पष्ट झाला आहे. हे संशोधन द प्लांट सेल या संशोधनपत्रिकेमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे.
वनस्पतीमध्ये वातावरणातील घटकांना प्रतिसाद देणारे संप्रेरक म्हणून अॅबसिसिक अॅसिड (ABA)ओळखले जाते. ते योग्य वातावरण येईपर्यंत बियांच्या अंकुरणाला रोखून धरते. बियांमध्ये अंकुरणाच्या प्रक्रियेला रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये हे संप्रेरक मध्यवर्ती भूमिका निभावते. मात्र ते नेमके कसे काम करते, याविषयी आजवर फारशी माहिती उपलब्ध नव्हती.
मात्र चायनीज शास्त्र अॅकेडमीच्या क्षीशुआंगबन्ना ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन, चीन शास्त्र आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आणि हुनान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संप्रेरकाच्या विरुद्ध भूमिका बजावून अंकुरणाच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्या नायट्रेटमुळे वनस्पतीच्या अंतर्गत कोणते बदल घडतात, यांचा शोध घेतला आहे. या संशोधनामुळे अॅबसिसिक अॅसिड आणि नायट्रेट यांच्या कार्यामध्ये असलेला हा विरुद्धधर्मी संबंध स्पष्ट झाला आहे.
...असे आहे संशोधन
नायट्रेटमुळे बिया अंकुरणाला चालना मिळण्याच्या प्रक्रियेमागील यंत्रणेचा शोध घेताना शास्त्रज्ञांना निन लाइक प्रोटीन ८ (Nin-Like Protein ८ - NLP 8) आढळले. ते जनुकांच्या कार्यान्वयनाला चालना देते. या प्रयोगामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मात्रेमध्ये नायट्रेटचे प्रमाण असलेल्या स्थितीमध्ये अर्बिडॉप्सिस वनस्पतीच्या बिया ठेवून, त्यात अंकुरणाची प्रक्रिया होत असताना त्यातील जनुके कशी प्रतिक्रिया देतात, यांचे विश्लेषण केले गेले. त्यात नायट्रेटच्या मात्रेसोबतच विविध प्रक्रियांचा बियांच्या अंकुरणाच्या दरावर आणि वेळेवर होणारा परिणाम तपासण्यात आला.
त्यासाठी बियांना पोटॅशिअम नायट्रेट आणि अॅबसिसिक अॅसिड हे घटक बाहेरून पुरविण्यात आले. सामान्यतः अॅबसिसिक अॅसिडमुळे रोखली जाणारी अंकुरणाची प्रक्रिया नायट्रेटमुळे काही प्रमाणात तरी वाढविल्याचे समोर आहे. या प्रक्रियेमध्ये नायट्रेटने NLP8 या प्रथिनांना कार्यान्वित केले, तर अॅबसिसिक अॅसिड रोखण्याच्या यंत्रणेमधील ABI3 आणि ABI5 हे घटक कार्यान्वित होत होते. नायट्रोजन संयुगामुळे ABA चे परिणाम काही प्रमाणात कमी झाल्यामुळे ABA च्या पातळीमध्ये काही बदल न करताही अंकुरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला.
नायट्रीक ऑक्साइडच्या यंत्रणेला अकार्यक्षम केलेल्या म्युटंट बियाण्यांमध्ये NLP8 ची अतिकार्यक्षमता ही एबीए याच्या अतिसंवेदनशीलतेला दाबून ठेवण्यात असल्याचे दिसून आले. त्यामुळे ताणाच्या स्थितीमध्ये बियांचा जोम वाढविण्यासाठी संभाव्य पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.