HSC Result 2024 : लातूर विभागाचा ९२.३६ टक्के निकाल

HSC Maharashtra Result Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत लातूर विभागाचा निकाल ९२.३६ टक्के लागला आहे.
HSC Result
HSC Result Agrowon

Latur News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत लातूर विभागाचा निकाल ९२.३६ टक्के लागला आहे. त्यात लातूर विभाग राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.

लातूर विभागीय मंडळात लातूर, धाराशिव व नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांत विशेष प्रावीण्यासह प्रथमश्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५१ टक्के आहे.

HSC Result
International Biodiversity Day : ओळख देशी वनस्पतींमधील जैवविविधतेची

परीक्षेसाठी ९२ हजार ९३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९१ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ८४ हजार ५४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १२ हजार १६९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, ३५ हजार ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३१ हजार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर पाच हजार ८०८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले, असे विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग म्हणाले.

HSC Result
12th (HSC) Result : १२ वीचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के! कोकणाची बाजी, सर्वात कमी निकाल मुंबईचा

निकालात दोन टक्के वाढ

गेल्यावर्षी विभागीय मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के होता. यंदा त्यात दोन टक्के वाढ झाली आहे. परीक्षेला विज्ञान शाखेचे ५० हजार ३३५ पैकी ४९ हजार, कला शाखेचे २९ हजार ३३४ पैकी २४ हजार ६७१ तर वाणिज्य शाखेचे आठ ३६५ पैकी सात हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा दिलेल्या ५० हजार ३६९ मुलांपैकी ४५ हजार ३१३ (८९.९६ टक्के) तर ४१ हजार १५९ पैकी ३९ हजार २२८ मुली (९५.३० टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. विभागात लातूर जिल्ह्याचा ९४.३० टक्के, धाराशिवचा ९१.१७ टक्के तर नांदेड जिल्ह्याचा ९१.११ टक्के निकाल लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com