12th (HSC) Result : १२ वीचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के! कोकणाची बाजी, सर्वात कमी निकाल मुंबईचा

12th Result Updates : राज्यातील सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहीलेली वेळ जवळ आलेली आहे. राज्यातील बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. यात राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे.
12th Results
12th ResultsAgrowon

Pune News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (ता.२१) १२ वीचा निकाल जाहीर केला. मंडळाने जाहीर केलेल्या निकालात राज्याचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. तर यात कोकण विभागाने बाजी मारली असून यंदा ९७.५१ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून तो ९१. ९५ टक्के आहे. यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर मंगळवारी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यावेळी सर्व माहिती दिली. यावेळी गोसावी यांनी विभागनुसार टक्केवारी जाहीर केली.

तसेच किती विद्यार्थी परिक्षार्थी होते आणि किती विद्यार्थ्यांनी यश संपादन केले याची माहिती दिली. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. याचा निकाल त्यांना आज १ वाजता पाहता येणार आहे.

12th Results
12th Results : विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीच्या निकाल मंगळवारी

दरम्यान राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे बारावीचा निकालाबाबत माहिती दिली होती. याप्रमाणे यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. ही परिक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली होती.

यंदा लागलेल्या निकालावरून मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. यंदा 3.८४ टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात तब्बल २.१२ टक्क्यांची वाढ आहे.

12th Results
MPSC Exam Result : शेतकऱ्याचा पोरगा MPSC मध्ये राज्यात पहिला, कोल्हापुरचा महाराष्ट्रात डंका

निकाल पाहण्यासाठी वेबसाइट

mahresult.nic.in,

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

results.digilocker.gov.in

विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे

कोकण - ९७.५१

नाशिक - ९४.७१

पुणे - ९४.४४

कोल्हापूर - ९४.२४

छत्रपती संभाजीनगर - ९४.०८

अमरावती - ९३.००

लातूर - ९२.३६

नागपूर - ९२.१२

मुंबई - ९१.९५

कसा पहाल निकाल?

mahresult.nic.in या वेबसाईटवर जा. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result वर क्लिक करा. यानंतर सीट नंबर आणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटण दाबा. यानंतर तुमच्या स्क्रिनवर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल समोर येईल. याच्यानंतर PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com