Mango Rate : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची आवक वाढली, दरातही घसरण

Devgad Hapus : यंदाच्या हंगामामध्ये फेब्रुवारीपासून हापूसची आवक सुरू झाली. सुरवातीला देवगडमधील आंबा अधिक होता.
Mango Rate
Mango Rateagrowon

Vashi Mango Market : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूसच्या सुमारे ९० हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गुढीपाडवा, अक्षय तृतीया हे विशेष मुहूर्त असल्यामुळे बागायतदार या दिवशी हापूस आंबा विक्रीसाठी वाशीला पाठवतात. निर्यातीच्या गोंधळामुळे यंदा हापूसचे दर गतवर्षीपेक्षा कमी आहेत. सध्या पाच डझनच्या पेटीचा सर्वाधिक दर २३०० रुपये असल्याचे व्यापाऱ्‍यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामामध्ये फेब्रुवारीपासून हापूसची आवक सुरू झाली. सुरवातीला देवगडमधील आंबा अधिक होता; मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात रत्नागिरीमधील आवक वेगाने वाढली. गुढीपाडव्यापासून खऱ्या अर्थाने आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आला. जानेवारीच्या अखेरीस वगळता अवकाळी पावसाचा हापूसला तेवढा फटका बसला नाही.

यंदा चार ते पाच टप्प्यात मोहोर आला असून उत्पादनही मुबलक आले आहे. सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या मार्केटमध्ये १ लाख पेटी आंबा दाखल झाला. त्यात ४७ हजार पेटी कोकणातील हापूसच्या, तर ५३ हजार पेटी या अन्य राज्यातील आंब्याच्या होत्या. गुरुवारी सकाळी अपेक्षेपेक्षा कमी पेट्या वाशीत दाखल झाल्या.

गुरुवारी ८२ हजार ६०८ पेटीपैकी कोकणातील ४३ हजार ३३६ तर अन्य राज्यांतील ३९ हजार २७२ पेटी आंबा होता. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी असते. दुबई बाजारात रत्नागिरी हापूसची पेटी ५ हजार रुपये दराने विकली जात असल्याची माहिती मिळत आहे.

गतवर्षी हापूसचे उत्पादन कमी होते; मात्र अखेरच्या टप्प्यात आंबा बाजारात येण्यास सुरवात झाली. यंदा सुरवातीला आणि शेवटी आंबा मोठ्या प्रमाणात राहणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आंबा कमी असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वाशीत अक्षय तृतीयेला गेलेल्या पेट्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्याचा फायदा हापूसचे दर स्थिरावण्यासाठी होऊ शकतो. दर्जेदार हापूसच्या ६० फळांच्या पेटीला २२०० ते २३०० रुपये दर मिळत आहे.

Mango Rate
Mango Market : अक्षय तृतीयेनिमित्त पुणे बाजारात विविध आंब्याची रेलचेल

यंदा वैशाख वणव्यातील उन्हाच्या झळा लवकर जाणवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम निश्‍चितच हापूसवर दिसून येतो. फळ लवकर तयार होत आहे. यावर्षी अक्षय तृतीयेला गतवर्षीच्या तुलनेत दर कमी आहे. वातावरणातील बदलांमुळे संपूर्ण हंगामात आंबा मुबलक असला तरीही दर्जेदार फळांची आवक कमी राहिली आहे.

- अशोक हांडे, व्यावसायिक

मुहूर्त साधून हापूसची आवक वाशी बाजारात सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मोहोराचे उत्पादन १५ मे नंतर हाती येईल. या आठवड्यात उत्पादन कमी आहे; मात्र दर्जेदार आंब्याला दर चांगला मिळत आहे.

- प्रदीप सावंत, आंबा बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com