Koyna Dam
Koyna DamAgrowon

Koyna Hydropower Project: कोयना विद्युतगृहासाठी ८६२ कोटींना मान्यता

Maharashtra Government Decision: कोयना धरणाच्या पायथ्याशी उभारल्या जाणाऱ्या जलविद्युत प्रकल्पासाठी ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Published on

Mumbai News: कोयना धरण पायथा विद्युतगृह या जलविद्युत प्रकल्पासाठी ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी, तर महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळअंतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त विद्युत निर्मिती करणे तसेच धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर, २x४० मेगावॉट) या योजनेचे नियोजन करण्यात आले.

Koyna Dam
Agriculture Mechanization: चार कृषी विद्यापीठांकडून यंत्र आणि अवजारांच्या प्रसारणाला मान्यता

दरम्यान २०२३ मध्ये शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्प, सौर आणि इतर अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आता हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला गेला आहे.

Koyna Dam
Cabinet Meeting : 'शक्तिपीठ'च्या भूसंपादनासाठी २० हजार कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक १३३६ कोटी ८८ लाखांपैकी ८६२ कोटी २९ लाख रूपयांच्या तरतुदीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना या योजनांसाठी २० टीएमसी पाणी विद्युत निर्मिती करून सोडले जाणार आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्यभरात विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसत‍िगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यामध्ये सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली असून शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com