POCRA Subsidy : ‘पोकरा’च्या पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात २३० कोटींचे अनुदान

Agriculture Subsidy : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच ‘पोकरा’च्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सुमारे ५० हजारांवर शेतकरी आणि १०४ शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुमारे २३० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.
POCRA 2
POCRA 2Agrowon

Buldana News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच ‘पोकरा’च्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सुमारे ५० हजारांवर शेतकरी आणि १०४ शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुमारे २३० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. या प्रकल्पाचा पहिला टप्पा आटोपला असून येत्या काळात दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प जून २०१८ पासून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत होता. प्रकल्प गावातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करणे हा प्रकल्पाचा प्रमुख उद्देश होता.

POCRA 2
POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

बुलडाणा जिल्ह्यातील ४१० गावांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. प्रकल्पाची सहा वर्षे कालावधीची मुदत ३० जून २०२४ रोजी समाप्त होत आहे. प्रकल्प कालावधीत जिल्ह्यातील ४९,९२५ वैयक्तिक शेतकऱ्यांना विविध घटकासाठी २१७ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, १०४ शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी बचत गटांना १२ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

प्रकल्पातील प्रमुख सिंचनाच्या घटकामुळे जिल्ह्यातील प्रकल्प गावांमध्ये २१ हजार ८२८.४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा केला जात आहे. १९,३५२ शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. प्रकल्पांतर्गत देण्यात आलेल्या कृषी औजारांमुळे ३ लाख ९८०० हेक्टर क्षेत्र कृषी यांत्रिकीकरणाखाली येण्यास मदत झाली.

POCRA 2
POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

प्रकल्पातून १०४ शेतकरी बचत गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध कृषी व्यवसायासाठी अनुदान देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने कृषी औजारे बँक, गोदाम, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, प्रक्रिया युनिट, लाकडी तेल घाणे आदी कृषी व्यवसायांचा समावेश आहे. कृषी व्यवसायामुळे जिल्ह्यामध्ये ६७१० टन क्षमतेची साठवणूक सुविधा निर्माण झाली असून विविध प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती झाली आहे.

प्रकल्पामधून ४७० मृद व जलसंधारण कामे पूर्ण झाली. त्यामध्ये प्रामुख्याने ढाळीचे बांध, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, खोल सलग समतल चर, गेबियन बंधारे, शेततळे इत्यादीचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत एकूण ७३६ हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विविध हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना सध्याच्या बदलत्या हवामानात हवामान अनुकूल शेती करण्यासाठी होणार आहे.

पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाने नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. यातून मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना, कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ देत सक्षम बनवण्याकडे पाऊल टाकण्यात आले.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com