Advance Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या बँक खात्यावर ८० कोटींची अग्रिम जमा

Soybean Insurance : सोयाबीनच्या विम्यापोटी अर्ज भरणाऱ्या ८८ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट ८० कोटी ७८ लाख रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Solapur News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पिकांसाठी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेरीस सोयाबीनच्या विम्यापोटी अर्ज भरणाऱ्या ८८ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट ८० कोटी ७८ लाख रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप २०२३ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात माहे ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळे व ८ तालुक्यांतील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत,

Crop Insurance
Soybean Crop : सोयाबीन पीक नुकसानीपोटी मिळणार २५ टक्के अग्रिम भरपाई

ओरिएंटल विमा कंपनीस जिल्हाधिकारी आशीर्वाद हे कंपनीच्या प्रतिनिधींच्या जिल्हास्तरावर झालेल्या सात ते आठ बैठकांमध्ये तसेच लेखी पत्राद्वारे वारंवार सूचना देऊन तसेच अपर मुख्य सचिव कृषी विभाग, आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठपुरावा करत होते, अखेरीस या पाठपुराव्याला यश आले आणि ही रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Crop Insurance
Soybean Crop Compensation : सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

बाजरी, मका उत्पादकांनाही लवकरच भरपाई वास्तविक, विमा कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पिकासाठी आगाऊ रक्कम मंजूर केली. परंतु त्या आधी सोयाबीनच्या अग्रिम बाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते.

त्या अपिलावर विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घेतली. त्या सुनावणी मध्ये जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढल्याने विमा कंपनीला जिल्ह्यातील ८८ हजार ३५२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी ७८ लाख रुपये अग्रिम जमा करावी लागली. आता उर्वरित बाजरी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल, असेही गावसाने म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com