Animals Food Infection
Animals Food Infectionagrowon

Animals Food Infection : कोल्हापुरातील ८ जनावरांचा मृत्यू; पिंजार आणि उसाच्या वाड्यातून विषबाधा

Gokul Dush Sangh : कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील कुरुकली, बानगे येथील ८ जनावरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गोकुळ पशुखाद्यावर आरोप करण्यात आले होते.
Published on

Kolhapur Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील कुरुकली, बानगे येथील ८ जनावरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गोकुळ पशुखाद्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र, जनावरांचा मृत्यू पिंजार आणि उसाच्या वाड्यातून विषबाधा होऊन झाला आहे. औंध (जि. पुणे) येथील शासकीय प्रयोगशाळेत शासनाकडून पाठविलेल्या 'व्हिसेरा'चा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार ही वस्तुस्थिती पुढे आली आहे.

याबाबत गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पिंजार आणि उसाच्या वाड्यातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये 'गोकुळ' 'च्या महालक्ष्मी पशुखाद्याचा कोणताही दोष नाही. तसेच खाद्यातील युरियाही तपासला असून, तो नियमाप्रमाणे आहे. दूध उत्पादकांच्या नुकसानीबाबत येत्या आठवड्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत काय मदत करायची, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे". अशी माहिती गोडबोले यांनी दिली.

मागच्या १० दिवसांत एकूण आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे. परिसरातील जनावरांची काळजी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने डॉक्टरांचे पथक तैनात ठेवले आहे. त्यांनी आजपर्यंत २३१ जनावरांवर मोफत उपचार केले आहेत.

Animals Food Infection
Kolhapur Milk Sanstha : कोल्हापुरातील ५०६ बोगस दूध संस्थांची नोंदणी रद्द; गोकुळमधील ७० टक्के दूध संस्थांना फटका

जनावरांच्या मृत्यूनंतर संबंधित शेतकरी हे 'गोकुळ'चे उत्पादक सभासद असल्यामुळे तेथे मोफत उपचार दिले आहेत. मात्र, मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ही संभ्रमावस्था आता शासकीय अहवाल आल्यामुळे संपली आहे. मात्र, या दूध उत्पादक सभासदांना कोणतीही नुकसान भरपाई अद्याप दिलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com