Voter List Update : सोलापूर जिल्ह्यात ७५ हजार मतदार वाढले

Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
Voter Registration
Voter RegistrationAgrowon
Published on
Updated on

Solapur News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अंतिम मतदार यादीत एकूण ३७ लाख ६३ हजार ७८९ मतदार आहेत. ६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या दरम्यान एकूण ७५ हजार ८२४ मतदारांची वाढ झालेली आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या ३० ऑगस्ट २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण ३७ लाख ६३ हजार ७८९ इतकी मतदार संख्या असून, यामध्ये पुरुष १९ लाख ३५ हजार ९७९, महिला १८ लाख २७ हजार ५०८ व इतर ३०२ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून, मतदारसंघनिहाय मतदारांची अंतिम यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या मतदारसंघात ३७२३ मतदान केंद्र आहेत. नव्याने १२४ मतदान केंद्राचीही भर पडली आहे.

Voter Registration
Voter Registration : तरुण मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारसंख्या

करमाळा मतदारसंघात एकूण ३ लाख २४ हजार ३५ इतकी मतदार संख्या झाली असून, येथे ४७३७ मतदारांची वाढ झाली. माढ्यामध्ये एकूण ३ लाख ४४ हजार ५४७ मतदार झाले आहेत. या ठिकाणी ५ हजार ३३९ मतदार वाढले आहेत.

बार्शीत ३ लाख २७ हजार ६५७ मतदार आहेत. या ठिकाणी ४७१९ मतदार वाढले आहेत. मोहोळला ३ लाख २५ हजार ९९९ इतकी मतदारसंख्या असून, येथे ४७६२ मतदार वाढले आहेत. सोलापूर शहर उत्तरमध्ये ३ लाख २२ हजार ६६८ इतके एकूण मतदार आहेत, याठिकाणी ८१९९ मतदार वाढले आहेत.

सोलापूर शहर मध्य येथे ३ लाख ३९ हजार ६०८ मतदार झाले आहेत. तर ९९४७ मतदार वाढले आहेत. अक्कलकोटला ३ लाख ७४ हजार ५३६ एकूण मतदार आहेत, याठिकाणी १० हजार १७१ मतदार वाढले आहेत. सोलापूर दक्षिणमध्ये ३ लाख ७२ हजार ५५३ एकूण मतदार संख्या असून, १० हजार ५६६ मतदार वाढले आहेत.

Voter Registration
Voter Update : जळगाव जिल्ह्यात मतदारसंख्येत १८ हजारांची वाढ

पंढरपूरला ३ लाख ६५ हजार ७२५ मतदार आहेत, येथे ५८७४ मतदार वाढले आहेत. सांगोल्याला ३ लाख २२ हजार २४० एकूण मतदार आहेत. तर ६६१९ मतदारांची वाढ झाली आहे. माळशिरसला ३ लाख ४४ हजार २२१ एकूण मतदार संख्या झाली असून, ४८९१ मतदार वाढले आहेत.

नागरिकांनी आपली नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करावी. तसेच ज्या नागरिकांचे अजूनही मतदार यादीमध्ये नाव नाही, त्यांनी निरंतर प्रक्रियेमध्ये नाव नोंदणी करून घ्यावी.
-कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com