Voter Update : जळगाव जिल्ह्यात मतदारसंख्येत १८ हजारांची वाढ

Loksabha Election : अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर २९ फेब्रुवारीपर्यंत एकूण १७ हजार ९५५ नवीन मतदारांनी नाव नोंदणी केली आहे.
Election
ElectionAgrowon

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने २० हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक कामी नियुक्ती केली आहे. ३५ हजार कर्मचाऱ्यांची नावे मतदान प्रक्रियेसाठी घेण्यात आली आहे. २३ जानेवारीस अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर २९ फेब्रुवारीपर्यंत एकूण १७ हजार ९५५ नवीन मतदारांनी नाव नोंदणी केली आहे.

जळगाव व रावेर लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच उमेदवारी अर्ज भरावा लागणार असून जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा अशी दोन कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात येत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार होते. आता ३५ लाख ९ हजार ५३ झाले आहेत. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३ हजार ५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्रांची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३ हजार ५६४ झाली आहे.

Election
Lok Sabha Election : सोलापूर जिल्ह्यात दीड हजार मतदारांसाठी एक केंद्र

जिल्ह्यात शहरी भागात १ हजार ६९ व ग्रामीण भागात २ हजार ४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १ हजार ६०८ असे एकूण २ हजार ३८ ठिकाणे आहेत.१४ ठिकाणी सहायक मतदान केंद्र सुरू करण्यात येतील. कारण त्या ठिकाणी मतदारांची संख्या १ हजार ५०० च्या वर आहे. १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन आहे. दुर्गम भागातील १६ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही,अशी ठिकाणी ड्रोन व वॉकीटॉकीने मतदानाची आकडेवारी घेण्यात येईल.

जिल्ह्याची लोकसंख्या ४७,४०,८८२ इतकी आहे. यात ३५ लाख ९ हजार ५३ मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये १८ लाख २० हजार १४२ पुरुष तर १६ ८८ हजार ७८१ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी १३५ मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग १९ हजार २११ मतदार आहेत. ८० वर्षांवरील वयोमान असलेले १ लाख ३ हजार १२९ मतदार आहेत.

Election
Election Process : निवडणूक प्रक्रिया बिनचूक होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक

दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा ७२ टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९२७ महिला असे आहे. यात सुधारणा झाली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या १६ हजार २२९ वरून ३८ हजार २९६ झाली आहे. २०२२ पासून जिल्ह्यात एकूण ६३ हजार मतदारांची वाढ झाली आहे. २ लाख ४३ हजार १५ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, तर ३ लाख मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे.

आकडे बोलतात

जिल्ह्यात मतदान केंद्र ३ हजार ५६४

वेबकास्टिंग होणारे मतदान केंद्र १ हजार ७८२

जिल्ह्यात बॅलेट युनिट ९ हजार ३३९

कंट्रोल युनिट ५ हजार ४५०

व्हीव्हीपीएटी मशिन ५ हजार ७३३

जिल्हा प्रशासनाने जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतदानापर्यंतची कार्यपद्धती तयार केली आहे. त्यानुसार २० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जळगाव व रावेर लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केले जातील.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com