Rabi Sowing : पुणे विभागात ७५ टक्के पेरण्या पूर्ण

Sowing Update : विधानसभेच्या निवडणुका व ऊस गळीत हंगाम वेळेत सुरू न झाल्यामुळे रब्बी पेरण्या धीम्या गतीने सुरू होत्या. त्यातच मागील पंधरवड्यात थंडी वाढल्यामुळे वेगात पेरण्या सुरू झाल्या आहेत.
Sowing
SowingAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभेच्या निवडणुका व ऊस गळीत हंगाम वेळेत सुरू न झाल्यामुळे रब्बी पेरण्या धीम्या गतीने सुरू होत्या. त्यातच मागील पंधरवड्यात थंडी वाढल्यामुळे वेगात पेरण्या सुरू झाल्या आहेत. पुणे विभागात सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी सुमारे ८ लाख ६० हजार ६९६ हेक्टर म्हणजेच ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उगवण झालेल्या पिकांवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

गेल्या वर्षी याच काळात विभागात सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी सहा लाख ६२ हजार ९६० हेक्टर म्हणजेच ५८ टक्के पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी चांगलीच वाढ झाली आहे. परंतु चालू वर्षी ऊस गळीत हंगाम उशिराने सुरू झाल्याने अजूनही गहू, हरभरा या पिकांच्या बाकी आहेत. त्यातच पावसामुळे थंडी कमी झाल्यामुळे पेरण्या करण्याचा वेग मंदावला आहे.

Sowing
Rabi Sowing : मराठवाड्यात १८ लाख २७ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत असून पिके जोमदार आहेत. गहू पिकाची काही भागातील पेरणी बाकी असून, पेरणी झालेल्या क्षेत्रातील गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी गहू पीक मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकाची काही भागातील पेरणी बाकी असून, पेरणी झालेल्या क्षेत्रातील हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. करडई, सूर्यफूल व तीळ पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

Sowing
Bajari Sowing : बाजरी पेरणीला पुढील आठवड्यात सुरुवात

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. गहू पिकाची पेरणी चालू आहे. सद्यःस्थितीत मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये खरीप हंगामातील तूर पीक फुलोरा अवस्थेत आहे. चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने तूर पिकाच्या उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत गहू पीक रोप अवस्थेत आहे. हरभरा पीक काही ठिकाणी रोप अवस्थेत तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

नगर ४,५८, ६३६ ३,२६,५६१ ७१

पुणे २,२९,७१२ १,५२,०१५ ६६

सोलापूर ४,६०,९१८ ३,८२, १२० ८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com