Buldana News : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता.२०) मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाने तयारी केली असून कामासाठी शासकीय, खासगी वाहने बुक केली आहेत. बुलडाणा विभागातील २६८ बसेस निवडणूक कामासाठी दोन दिवस राखीव ठेवण्यात आल्याने पुढील दोन दिवस प्रवाशांना अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता आहे.
विधानसभेसाठी जिल्ह्यातील सातही आगारांतून दोन दिवसांनी बसेसची बुकिंग झाली आहे. त्यामध्ये मलकापूर आगारातून ३० बसेस, बुलडाणा ४२, चिखली ३९ सिंदखेडराजा ४३, मेहकर ४३, खामगाव ३१, तर जळगाव जामोद बस आगारातून ४० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील चिखली, बुलडाणा, मेहकर, मलकापूर, सिंदखेडराजा, खामगाव आणि जळगाव जामोद या सात मतदार संघांत मतदान होणार आहे. ईव्हीएम व मतपत्रिका सिलिंग करण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात आली आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निवडणूक कर्मचारी एकत्र बोलावले जात असून त्यानंतर एसटीच्या साह्याने मतदार संघातील विविध मतदान केंद्रांपर्यंत निवडणूक विषयक सर्व साहित्य कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. यासाठी महामंडळाच्या बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातील बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, शेगाव, खामगाव आणि जळगाव जामोद या ठिकाणी ३४४ बसेस उपलब्ध आहे. त्यातील २६८ बसेस निवडणुकीचा कामासाठी राखीव ठेवल्यात जाणार असल्याने उर्वरित १०६ बसेसवर दोन दिवस प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.
त्यासाठी जादा बसेसच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. मतदानाच्या एक दिवसआधी मतदान पथके रवाना होणार असल्याने १९ नोव्हेंबर व मतदार आटोपल्यानंतर २० नोव्हेंबरपर्यंत बसेस बुक राहतील. मंगळवारी दुपारनंतर अनेक मार्गावरील बसेस फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.