Wanrai Bund : विभागात लोकसहभागातून ७१०० वनराई बंधारे

Mohan Wagh : पावसाळा संपल्याने ओढे-नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी ७ हजार १०० वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येत आहेत, अशी माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.
Forest Dam
Forest DamAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक विभागात २०२३-२४ या वर्षात नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमी प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सद्यःस्थितील ओढे-नाल्यांमध्ये अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.

पावसाळा संपल्याने ओढे-नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी ७ हजार १०० वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येत आहेत, अशी माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.

जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह चालू असतो. हा पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी संरक्षित पाणी घेण्यासाठी ग्रामपातळीवर नियोजन गरजेचे आहे.

पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री जसे की, सिमेंट खतांची रिकामी पोती, माती, वाळू याचा वापर करून तात्पुरता बांध घालून वनराई बंधारे बांधण्यात येतात. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत काही अंशी दिलासा मिळतो.

Forest Dam
Wanrai Bund : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक वनराई बंधारे

पाण्याची टंचाई असणाऱ्या गावांची निवड करून तसेच ज्या गावात पाणलोट विकासाची कामे सुरू नाहीत, अशा गावांत वनराई बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर घेतल्यास वर्षानुवर्षे पाणलोट विकास कार्यक्रमांपासून वंचित राहणाऱ्या गावांना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दिलासा मिळणार आहे.

Forest Dam
Wanrai Bunds : अमरावती विभागात पूर्णत्वास आले २९०४ वनराई बंधारे

२०२३-२४ मधील वनराई बंधारे व संरक्षित सिंचन स्थिती

जिल्हा वनराई बंधारे लक्ष्यांक बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या उपलब्ध सरासरी पाणीसाठा (टीएमसी) सिंचनाखाली आलेले सरासरी क्षेत्र (हेक्टर) उत्पादनात झालेली

अंदाजित वाढ (लाख रुपये)

नािक ३,१०० ९९६ १९९.२ १,९९२ ४९८

धुळे १,००० १२८ २५.६ २५६ ६४

नंदुरबार १,४०० १,१९८ २३९.६ २,३९६ ५९९

जळगाव १,६०० १६६ ३३.२ ३३२ ८३

एकूण ७,१०० २,४८८ ४९७.६ ४,९७६ १,२४४

वनराई बंधारे बांधण्याबाबत केलेल्या नियोजनाचे यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्यःस्थितीत एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचा मोठा खंड असल्यामुळे टंचाईसदृश परीस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होण्यासाठी, जनावरांना पिण्याचे पाणी, चारा उपलब्धतेसाठी नाशिक विभागातील गावांमध्ये सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात लोकसहभाग नोंदवून वनराई बंधाऱ्यांची कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यास सहकार्य करावे.
मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com