Mulberry Cultivation : मराठवाड्यात २ हजार एकरांवर तुती लागवडीचे लक्ष्य

Mahareshim Abhiyan : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी तुती लागवडीचे २०७५ एकरांवर तुती लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला आहे.
Mulberry Cultivation
Mulberry CultivationAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी तुती लागवडीचे २०७५ एकरांवर तुती लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. या लक्ष्यांकाच्या पुढे जाऊन महारेशीम अभियानातून ३६६२ शेतकऱ्यांनी निवडीतून ४०४९ एकर क्षेत्रावर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. तसे नियोजन रेशीम विभागाकडून करण्यात आले आहे.

दोन-तीन वर्षांतून एकदा अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाला आपलेसे केले आहे. जालनासह नव्याने तयार झालेल्या कोष खरेदी बाजारपेठांनी रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. याशिवाय रेशीम सुताचे उत्पादनही मराठवाड्यात होऊ लागले आहे.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : तुतीची लागवड करून रेशीम शेती करावी

मराठवाड्यात आतापर्यंत ८०२४ शेतकऱ्यांनी ८२५०.७५ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे. यंदाच्या हंगामासाठी धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ३०० एकर, परभणीसाठी २२५ एकर, हिंगोलीसाठी २५० एकर तर नांदेड व लातूर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी २०० एकर मिळून २०७५ एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : सासवडमधील १४ गावांत होणार तुती लागवड

या उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने नियोजन करताना महारेशीम अभियानाच्या माध्यमातून २०२३-२४ च्या हंगामासाठी ३६६२ शेतकऱ्यांची झालेल्या नोंदणीतून निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६५९, जालनामधील ६९८, परभणीतील २६४, हिंगोलीतील २५८, नांदेडमधील ५४०, लातूरमधील ४२५, धाराशिवमधील ३६३, तर बीडमधील ४५५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ४०४९ एकर क्षेत्रावर तुती लागवडीच नियोजन करण्यात आले आहे.

२ कोटी १० लाख रोपांची निर्मिती

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांकरिता देण्यात आलेल्या २०७५ एकर तुती लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४०४९ एकर क्षेत्रावर तुती लागवडीसाठी ३६६२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीनुसार लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी २ कोटी ४२ लाख ९४ हजार रोपांची आवश्यकता असणार आहे.

तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आधी रोपांची नर्सरी करण्याचे प्रयोजन आहे. त्यानुसार नियोजन आतून २ कोटी १० लाख ५३ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय लागणारी उर्वरित रोपेही तयार करण्याचे काम सुरू असल्याचे रेशीम विभागाकडून सांगण्यात आले.

महरेशीम अभियानातून उद्दिष्टाच्या तुलनेत पुढे जाऊन शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंद केली आहे. नोंदणीनुसार लागवडीसाठी आवश्यक रोपांची उपलब्धताही जवळपास आहे. परंतु लांबलेला व अपेक्षित न पडणारा पाऊस लागवडीत खोडा घालतो आहे. पाऊस चांगला झाल्यास नोंदणी नुसार क्षेत्रावर तुती लागवड होईल.
- बी. डी. डेंगळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com