Department Of Water Resources : ‘कृष्णा खोरे’ची ६६८ कोटींची पाणीपट्टी वसुली

Krushna Khore Irrigation : जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने या वर्षी पाणीपट्टी वसुलीत (महसूल) चांगलीच आघाडी घेतली आहे.
Krushna Khore
Krushna Khore Agrowon

Pune News : जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने या वर्षी पाणीपट्टी वसुलीत (महसूल) चांगलीच आघाडी घेतली आहे. या वर्षी सिंचन आणि प्रकल्प या दोन्ही विभागांची मिळून एकूण ६६८ कोटी ३९ लाख रुपये पाणीपट्टी वसुली झाली आहे.

मागील वर्षीपेक्षा सुमारे १२८ कोटी रुपयांची अधिक भर पडली आहे. एकूणच पाणीपट्टी या वर्षी ११६ टक्के वसुली झाली आहे. जलसंपदाच्या अंतर्गत कृष्णा खोरे विकास महामंडळ असून, याअंतर्गत सिंचन आणि प्रकल्प मंडळ असे दोन विभाग आहेत.

Krushna Khore
Agriculture Irrigation : रत्नागिरीत १२ हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट

या दोन्ही विभागात पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा सिंचन मंडळ, सांगली पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ यासह कुकडी प्रकल्प आणि सोलापूर (कडा) पाटबंधारे मंडळ समाविष्ट आहेत. दोन्ही प्रकल्पांतून पुण्यासह, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नगर व धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात शेती (सिंचन) आणि

Krushna Khore
Agriculture Irrigation : ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही

नागरिकांसह काही छोटे-छोटे हाऊसिंग प्रकल्प, औद्योगिक वसाहत, सोसायट्या, मोठ-मोठी रिसॉर्टस यांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. शेती तसेच पिण्यासाठी पाणी देताना त्यासाठी नियमानुसार आवश्यक असलेली पाणीपट्टी कृष्णा खोरे विभागाच्या वतीने वसूल करण्यात येते. मागील वर्षीच्या जून महिन्यात जलसंपत्ती विभागाने राज्यातील सर्व प्रकारच्या पाणीपट्टीच्या दरात चांगलीच वाढ केली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

मंडळनिहाय पाणीपट्टी वसुली, कोटी रुपयांमध्ये :

कार्यालयाचे नाव -- उद्दिष्ट -- पाणीपट्टी वसुली

पुणे पाटबंधारे मंडळ -- ३४५ -- ४३२.३२

पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ -- ०.०२ --- ०.००१

सातारा सिंचन मंडळ --- २७.३२ -- २२.८८

सांगली पाटबंधारे मंडळ -- ६१.३२ -- ४९.२९

कोल्हापूर पाटबंधारे मंडळ --- ५१.३४ -- ६१.३७

कुकडी प्रकल्प -- १२.९९ -- १४.१४

सोलापूर (कडा) --- ७९.०१ -- ९२.८७

एकूण --- ५९२.०२ -- ६६८.३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com