Sugar Production : मराठवाड्यासह खानदेशात ६४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Sugar Production : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी सोमवारपर्यंत (ता. १९) ७५ लाख ७० हजार ८५४ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.५२ टक्के साखर उताऱ्याने ६४ लाख ४९ हजार ८६८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी सोमवारपर्यंत (ता. १९) ७५ लाख ७० हजार ८५४ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.५२ टक्के साखर उताऱ्याने ६४ लाख ४९ हजार ८६८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना बीड व खानदेशातील नंदुरबार व जळगाव मिळून पाच जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये नऊ खासगी व १३ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे या कारखान्यांची सरासरी ऊसगाळप क्षमता ८९ हजार ४०० टन प्रतिदिन इतकी आहे परंतु उसाची उपलब्धता लक्षात घेता कारखाने क्षमतेनुसार प्रतिदिन ऊस गाळप करू शकले नाहीत सोमवारी प्रतिदिन क्षमतेच्या तुलनेत प्रत्यक्षात या कारखान्यांनी ५४ हजार ४५० टन प्रतिदिन क्षमतेनेच ऊस गाळप केले.

Sugar Factory
Sugar Production : देशात २२३ लाख टन साखरेची निर्मिती

१९ फेब्रुवारीपर्यंत गाळप हंगामात कारखान्यांनी ७५ लाख ७० हजार ८५४ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.५२ टक्के साखर उताऱ्याने ६४ लाख ४९ हजार ८६८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जवळपास तीन कारखान्यांचा हंगाम गत आठवड्यापूर्वीच आटोपला होता.

फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतांश कारखान्यांचा हंगाम आटोपण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे उसाची उपलब्धता व होणारे गाळप पाहता गतवर्षी इतकेच ऊस गाळप व साखर उत्पादन होण्याची आशा साखरे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Sugar Factory
Sugar Production : कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उत्पादनात डंका, शेतकऱ्यांना हंगाम लांबणीचा मात्र फटका

जिल्हानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन (टन व क्विंटलमध्ये)

नंदुरबार : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ९ लाख ८ हजार २३८ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.६३ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख ८३ हजार ७९८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जळगाव : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी १ लाख ८७ हजार ६९ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.९१ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ६७ हजार २५६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३ सहकारी ३ खासगी मिळून ६ कारखान्यांनी १५ लाख २६ हजार ३८० क्विंटल उसाचे गाळप करत १४ लाख ५३ हजार ५२५ क्विंटल साखर उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.५२ टक्के इतका राहिला.

जालना : जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून पाच कारखान्यांनी १९ लाख ७९ हजार ५९५ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.६ टक्के साखर उताऱ्याने १७ लाख ९७ हजार ४६५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड: जिल्ह्यातील पाच सहकारी व दोन खासगी मिळून ७ कारखान्यांनी ३२ लाख ४९ हजार ५५२ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.८ टक्के साखर उताऱ्याने २५ लाख ३४ हजार ३४२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com