Sugar Rate
Sugar RateAgrowon

Sugar Production : देशात २२३ लाख टन साखरेची निर्मिती

Sugar Season : देशाचा गळीत हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. १५ फेब्रुवारीअखेर देशात २२३ लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे.
Published on

Kolhapur News : देशाचा गळीत हंगामाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. १५ फेब्रुवारीअखेर देशात २२३ लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. या कालावधी अखेर महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी कायम राखली आहे. राज्यात ७९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेशामध्ये ६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

कर्नाटकात ४२ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात ५ लाख टनांनी कमी आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांत ८५ टक्के साखर निर्मिती झाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील ५०७ साखर कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीच ५०३ साखर कारखाने सुरू होते.

Sugar Rate
Sugar Production : देशात यंदा ३१३ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता

यंदा सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्राचे उत्पादन कमी होते. पण नोव्हेंबरच्या अखेरीनंतर मात्र उत्‍पादनात चांगली वाढ झाली. गेल्या वर्षी या कालावधीत २३६२ लाख टन उसाचे गाळप झाले. यंदा २२६८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले.

साखर उताऱ्यातही फारशी चढ-उतार पाहायला मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ९.६९ टक्के साखर उतारा होता. यंदा ९.८६ टक्के साखर उतारा आहे. साखर उतारा थोड्या फरकाने यंदा अधिक आहे.

Sugar Rate
Sugar Production: इथेनॉल निर्मितीसाठी साखर वापरण्यास आडकाठी?

यंदा या कालावधीत २६ साखर कारखाने बंद झाले आहेत. या मध्ये कर्नाटकात सर्वाधिक १५ साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ८ साखर कारखाने बंद झाले आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षी या कालावधीत तब्बल १७ कारखाने बंद झाले होते.

यंदा ही संख्या केवळ ४ आहे. महाराष्ट्रात ऊस हंगाम लवकर संपेल हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जादा संख्येने कारखाने सुरू आहेत. अजूनही किमान एक महिना तरी ऊस हंगाम चालण्याची शक्यता आहे.

यंदा ३१४ लाख टन साखर निर्मितीचा अंदाज

उत्तर प्रदेशामध्येही केवळ एकच कारखाना बंद झाला आहे. कर्नाटक वगळता महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांत अजूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू असल्याचे चित्र आहे. तमिळनाडूत ३ कारखाने बंद झाले आहेत.

साखर कारखाने बंद होण्याची गती पाहता यंदा कर्नाटकात इतर राज्यांच्या तुलनेत लवकर हंगाम संपेल, अशी शक्यता आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा ३१४ लाख टन साखर तयार होईल, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com